आज लढला सिंह कोंडाण्यासाठी ४/२/१६७०


त्या दिवशी वारे बरेच वाहत होते. देवासामोरील वात फरफरत तेवत होती, जिजाऊ आपल्या बिछान्यावर पहुडलेल्या. शिवबा त्यांचे पाय रगडित होते . जिजाऊंची नजर आपल्या खिडकीतून समोर गेली . आणी त्या ताडकन उठून खिडकीजवळ उभ्या ठाकल्या मागोमाग राजे होतेच
" काय झाले आऊ साहेब"
"शिवबा, शिवबा मोघली ध्वज मिरवणारा कोंडाणा आमच्या डोळ्यात खूप दिवस सलत आहे शिवबा

शिवबा राजेंना हुकुमच भेटला होता
आईची आज्ञा शिरसावंद्य मानणारा राजा
इतक्यात
महालाचे पडदे बाजूला सारून एक धिप्पाड देहाचा माणूस आईसाब, राजं करीत आत आला. तो होता तान्हाजी मालुसरे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन तो आला होता.

तान्हाजी आले त्यांनी आऊसाहेबांचे पाय शिवले महाराजांना मुजरा करीत गळाभेट घेतली.
" राजं आपली पायधूळ झाडायची पोराला सुनं ला आशीर्वाद द्याया यायचे राजं बरका आऊसाहेब"
पण दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्याचे तेज इतरवेळी सारखे नव्हतं. आणि तान्हाजीला हे लगेच जाणवलं. अहो जाणवणारच की बालपनाचं मैतर त्ये.
"राज काय झालं सगळी खैरीयत तर हाय न्हव.मी आल्या पासून बघतोय काय तरी लपवतायीसा ह्या तान्ह्या पासून"
" अरे काही नाही तान्या" "न्हाय कसं काय तरी हाय राजं आई तुळजा भवानीची शपत तुम्हास्नी काय त्ये बोला"
तान्ह्या आम्हीं कोंढाणा सर् करायला जाणार आहोत
"काय त्ये जमायचे न्हाय राजं कोंडण्यावर आन म्या कुठ घरी अजाबात न्हाय म्या जातो अन् कोंडाणा घेऊन येतो का आता आमच्या तलवारी वर तुमचा इस्वास न्हाय"
"तसं नाही तान्हाजी"
"अररं तान्ह्या येडा का खुळा तू घरी लगीन काढलंय, पै-पाहुण जमल्यात, अन्न रांदतय, दारात मांडव पडलाय, निविद दाखवलाय, औतन पोचल्यात अन् तू मोहिमेवर गेलास तर जग हसलं राजांवर वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय"
"वा आईसाहेब कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्हीं भात आमटी वरपायची, नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर मोहिमवर आईसाब जग हसल आम्हास्नी श्यान घालल तोंडात"
"तान्ह्या आदी रायबाचं लगीन पार पाड" "नाही राजआधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं"
राजे हे काय पोर ऐकणाऱ्यातल न्हाय तुम्ही द्या याला मोहीम

आणि भांडून मोहिमेचे विडे घेऊन हा सिंह मोहिमेवर गेला गेला तो परत न येण्यासाठीचं.

पाचशे मावळे सोबत घेऊन ते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले.



त्यांच्या लढाईचे सभासद बखरीतील वर्णन - तानाजी मालुसरा हजारी मावळीयांचा होता. त्याने कबुल केले किं, "कोंडाणा गड आपण घेतो." असें कबूल करून वस्त्रें, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्रीं गडाच्या कड्यावरून चढविले. जैसे वानर चालून जातात, त्याचप्रमाणे कड्यावर चालून गेले. आणि कडा चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लावून वरकड लोक देखील तानाजी मालुसरा चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लावून वरकड लोक देखील तानाजी मालुसरा चढून गडावरी तीनशे माणूस गेले. गडावरी उदेभान राजपूत होता. त्यासी कळले की, गनिमाचे लोक आले.

हि खबर
कळून कुल राजपूत कंबरकस्ता होऊन, हातीं तोडा बा घेऊन, हिलाल, चंद्रज्योती लावून बाराशें माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, पटाईत, सु-या, आडहत्यारी ढाला चढवून चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी 'श्रीमहादेव!' असें स्मरण करून नीट फौजेवर राजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर जालें पांचशे रजपूत ठार जालें. चाळीस पन्नास मावले ठार जाले. उदेभान किल्लेदार खासा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गांठ ओअडली. दोघे मोठे योद्धे त्यांशी व तानाजी मालसुरा सुभेदार यांशी गांठ पडली.दोघे मोठे योद्धे, महाशुर, एक एकावर पडले. वार करीत चालले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाहीं।



मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून, त्याजवरी वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. मोठे युद्ध केले. एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे पडले. दोघे ठार जाले. मग सूर्याजी मालसुरा, तानाजीचा
भाऊ, याने हिम्मत धरुन, कुल लोक सांवरुन, उरले रजपूत मा रले. कित्येक रजपूत कडे उडोन पळोन मेले. असें बाराशे माणूस मारिले. किल्ला काबीज केला. आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली . त्याचा उजेड राजीयांनी राजगडाहून पाहिला आणी बोलले किं गड घेतला. फत्ते जाली! असें जाहले टो जासूद दुसरे दिवशी वर्तमान घेऊन आला किं, "तानाजी मालसुरा यांनी मोठें युद्ध केलें. उदेभान किल्लेदार यास मारिलें आणि तानाजी मालसुराही पडला" असें सांगितले. गड फत्ते केला असें सांगताच राजे म्हणूं लागले किं, " एक गड घेतला, परंतु एक गड गेला!" असें तानाजीसाठी बहुत कष्टी जाहले. पुढे गडावरी ठाणे घातले. सूर्याजी मालसुरा भाऊ नावाजून त्याचा सुभा त्यास सांगितला. धारकरी लोकांस बक्षिसे सोन्याची कडी दिलीं.द्रव्य अपार दिलें. वस्त्रें जरी कुल लोकांस दिलीं. ये जातीने प्रथम कोंडाणा घेतला.

तान्हाजींचा पोवाडा इथे ऐका

Comments

  1. very good keep going

    ReplyDelete
  2. tanaji malusarena ... shradhhanjali

    ReplyDelete
  3. very good keep going

    ReplyDelete
  4. मस्तच रे आभ्या...
    वाचताना सुद्धा समोर बघत असल्यासारख वाटत होत.
    गड आला पण,सिंह गेला..
    जय महाराष्ट्र......!

    ReplyDelete
  5. narveer tanhaji malusare na majha manacha mujaraa..!!

    ReplyDelete
  6. झेलीतो वार... वार बघा तलवार...
    तानाजी मालुसरे झुंजार...
    मर्दाची तुटली बघा हो ढाल...
    हातावर झेलीले त्याने वार...
    झेलीतो वार... वार बघा तलवार..
    ...तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन..
    कोटी कोटी प्रणाम... तानाजी तुम्ही आमच्या सर्वांच्या हृदयी अमर झालात..

    ReplyDelete
  7. KHUP MANJE KHUPACH CHAN

    ReplyDelete
  8. te hote mhanu aamhi aahot aaj. nahi tar deshachi fhalhani zalich nasti karan tya purvi aapan srvajan hayat tari nasto nahi tar muslim houn namaz vachat asto.
    abhibhan aahe aamhala ki rajancya bhumi var janmala aalo.

    ReplyDelete
  9. Anonymous10:14

    khup saan lihle tumhi aahmi manapasun tumcha hardik aabhar ani abhinandan karto

    ReplyDelete
    Replies
    1. narveer tanaji malusare hencha balidan aahmi kadi visarnar nahi
      becouse i am releted a malusare family

      Delete
    2. यामुळेच माझ्यासारखे लोक शिवरायांना आपले म्हणण्यापासून दूर राहतात

      मराठे म्हणाले कि मराठा जातीचे लोक छाती बडवतात, काय म्हने तर राजे आमच्या जातीचे होते. इकडे ह्यांच्या नाकातला शेंबूड निघत नाही आणि म्हणे आम्ही राजे….
      दारू पिउन, गाडीच्या माघे लिहून, बायका नाचवून आपले राजेपण दाखवण्यापेक्षा जाऊन गडांची दुरुस्ती करावी, लोकांची सेवा करावी, किती तरी करू शकतात अर्थात मी राजे नसून करतो हे वेगले.
      राजांचे नातेवाईक आहेत म्हणजे आपण राजे होत नाहीत…
      अर्थात वरती लिहिलेले समजण्यासाठी आपले राजेपण थोडे बाजूला ठेवावे …. आणि शिवरायांप्रमाणे सर्वांच्या हिताचे चिंतावे.

      जय शिवराय, हर हर हर महादेव ……

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब