सिंहगडाविषयी काही

माझे मित्र श्री आदित्य बोर्डे यांचा एक अभ्यासात्मक लेख

माझ्या मनात तानाजी राव मालुसरे या विषयी अतीव आदर आहे . तरी कृपा करून माझ्या उत्तराचा चुकीचा अर्थ
घेऊ नये हि विनंती.


तानाजी राव मालुसरे यांच्या प्रकरणा बद्दल सभासद बखर , तुलसीदास शाहिराचा पोवाडा हे मुख्य आधार आहेत .

तुलीदासाचा पोवाडा जास्त विश्वसनीय मानता येत नाही . त्या पोवाड्या मध्ये घोरपडीचा किस्सा आहे तो मात्र संशयास्पद आहे. आसा प्रसंग घडला आसने हे शक्य नाही. किमान मला तो शाहिराचा कल्पना विलास वाटतो .

या शिवाय कवी भूषण देखील सिंहगड सर केल्याचा उल्लेख करतो पण त्यात तानाजी रावांचा उल्लेख नाही . पण किल्ला तानाजी राव मालुसरे यांनीच सर केला . आणि रात्रीच सर झाला असा अर्थ आहे .

तानाजीराव आणि मावळे कडा चढून गेले याला पोवाडा आणि सभासद बखर साक्ष आहे. वरती जाऊन कापा-कापी सुरु करणे आणि ते करत करत गडाचा दरवाजा ताब्यात घेणे (कदाचित हा सिंहगड चा कल्याण दरवाजा असावा ). आणि उरलेले मावळे दरवाजाने आत येणे आणि मग एकदम युद्ध सुरु करणे . एकदम युद्ध सुरु केल्याने उदय भान राठोड आणि त्याचे सैनिक गोंधळून जाने शहज शक्य आहे .

त्या काळी माळा (दोराची शिडी )लाऊन किल्ला सर करणे हि तर मराठ्यांची पद्दत होती त्या मूळे सिंहगड मराठ्यांनी ह्या पद्धतीने सर करणे हे देखील सहज शक्य आहे .तानाजी राव मालुसरे यांनी सिंहगड ४ फेब्रु १६७० रोजी घेतला.

आता तानाजी राव हे हजारी सरदार होते तसेच त्यांचा मुलगा रायबा च्या लग्नाचा प्रसंग सुद्धा पोवाड्यात येतो त्या मुळे तो देखील संशयास्पद आहे .

पण तानाजी राव आणि मावळे यांची युद्ध हा एक आसीम शौर्य चा एक अति उत्तम नमुना आहे. यात वाद नाही .

पण तानाजी राव यांच्या बलिदाना मुळे कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले . हे मात्र खरे नाही सिंहगड हे नाव किमान १६६३ पासून रूढ आहे . शिवाजी महाराजांचे या संबंधी १ कागद पत्र आहे . हे पत्र ३ एप्रिल १६६३ चे असून हे पत्र शिवाजी महाराजांनी मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना लिहिलेले आहे . या पत्रात सिंहगडावर फितवा झाला आहे तरी सिंहगड ची काळजी घ्यावी आसे सांगितले आहे. या पत्रात शिवाजी महाराज सिंहगड हा उल्लेख ४ वेळेला करतात .(पहा शिवकालीन पत्र सर संग्रह भाग -१ ,लेखांक ९२५) या वरून सिंहगड हे नाव १६६३ पासून रूढ आहे हे स्पष्ट आहे .अधिक माहिती - शिवाजी महाराजांचे उपलब्ध पत्र हे ३ एप्रिल १६६३ चे आहे .आणि यात सिंहगड या शब्दांनी या किल्ल्याचा उल्लेख येतो . या मुळे कोंढाण्याचे सिंहगड हे नाव किमान १६६३ पासून उपलब्ध आहे .म्हणजे सिंहगड हे नाव आगोदर पासून रूढ आहे .या मुळे जी दंत कथा सांगतात कि तानाजी राव यांनी किल्ला घेतल्यावर त्याचे नाव सिंहगड झाले . हा दावा आर्थात खोटा होतो कारण तानाजी राव यांनी सिंहगड ४ फेब्रु १६७० घेतला .

- आदित्य बोर्डे

आदित्य बोर्डे यांनी जसे सांगितले
त्या काळी माळा (दोराची शिडी )लाऊन किल्ला सर करणे हि तर मराठ्यांची पद्दत होती त्या मूळे सिंहगड मराठ्यांनी ह्या पद्धतीने सर करणे हे देखील सहज शक्य आहे.

* हे तसे बरोबरच आहे कारण याच सुमारास महाराजांनी घेतलेले सुलतानगड, लोहगड हे किल्लेही माळा लावून घेतल्याचेच उल्लेख आढळतात (जेधे शकावली)शककर्ते शिवराय

* उदयभानाकडून तानाजी मारले गेले हे निश्चित. पण तान्हाजींनी उदयभानस मारले हे सभासदाचे विधान शंकास्पद वाटते. सिंहगडावर तान्हाजींचे समाधीस्थान कोंढाणेश्वराच्या दक्षिणेस जवळच आहे तर उदयभानाचे थडगे (हिंदू समाधीला थडगे म्हणण्याचा प्रघात त्याकाळी होता) बऱ्याच अंतरावर कल्याणदरवाज्याजवळ आहे. याचा अर्थ तान्हाजींना मारल्यावर कल्याणदरवाज्याकडून येणाऱ्या सुर्याजीच्या उर्वरित सैन्याला रोखण्यासाठी जखमी अवस्थेतील उदयभान कल्याण दरवाज्याकडे आला असावा व तिथेच मारला गेला असावा. (शककर्ते शिवराय)
काहीही असो पण माणूस मात्र सिंहाच्या तोडीचाच होता एवढे नक्की

6 comments:

 1. Indeed, Nice article Aditya !! Very Good !!

  ReplyDelete
 2. ... and also nice blog, Abhishek !! Abhinandan !!

  ReplyDelete
 3. masttttttttttt pan ek khantt nehami rahin ki martyacha itihas ajunhi kitwk lokana mahit nahi

  ReplyDelete
 4. mast aankhi barich mahiti kalwa

  ReplyDelete
 5. mitra aadityacha lekh chhanch aae pan to varcha maharajancha foto badal kalantarane lokanna vatel amol kolhe mhanjech shivaji maharaj

  ReplyDelete
 6. chan ahe blog..itihas ha fakt abhyasaycha asto kay khar ani kay khot he mahtwach nasun apan tyatun yogy te ghen mahtwach..
  pan shaky titake wachalyashivay yogy te ghen he kalat nahi mhanun aplya wachanane samrudh zalele ase blog amhala nehmi wachayla milot..

  ReplyDelete