पुन्हा पुरंदर स्वराज्यात दाखल (८ मार्च १६७०)

नुकताच राजाराम महाराजांचा जन्म झाला होता.जन्मसमयी हा पुत्र पालथा उपजल्याने गडावर काहीशी अपशकुनाची भावना नांदत होती, दूरदर्शी महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा, अपशकुनाच्या भ्रामक कल्पनेने लोकांच्या मनावर पडलेले सावट दूर करण्यासाठी ते उद्गारले .

पुत्र पालथा उपजला दिल्लीची पातशाही पालथी घालेल

राजांच्या या चतुर वक्तव्यानंतर. भविष्य सांगण्यासाठी आलेल्या ज्योतिषाने देखील असेच काहीसे सांगितले, त्यानंतर सारा राजगड आनंदात बुडाला होता.महाराज ही आनंदी होतेच, पण मनात काहीतरी वेगळेचं वेध लागले होते. पुरंदरचा तहास चार वर्षे उलटून गेली होती. आणि हा तह देखील मोडायला मोगलांनीच पुढाकार घेतला होता, राजांनी आपली हालचाल करायला सुरवात देखील केली होती.पण राजगडाच्या आग्नेयेस जास्तीत जास्त १० कोस अंतरावर असणारा. तो बुलंद गड अजून पावेतो मोगलांकडेच होता.
कुठला हा किल्ला - किल्ले पुरंदर

पुरंदर घेण्याचा मनसुबा राजांनी बैठकीत सांगितला कोण? कोण घेतो पुरंदर सगळ्यांचीच मनगटे शिवशिवत होती .
पण हा मान मिळाला निळोपंत मुजुमदार यांना
आधीच स्वराज्यात असणारा हा किल्ला त्याची खडानखडा माहिती मावळ्यांना होती. बस ठरले पुरंदर घ्यायचा

पण गडाला घेरायाचा नाही तर छापा मारून गड काबीज करायचा हेच मराठ्यांचे युद्धतंत्र वेढा मारून दात कोरत बसने कधी ४ महिने कधी ८ महिने तर कधी वर्ष असला ढिसाळ कारभार माहीत नव्हता मराठ्यांना मार झडप की कर गडप.हेच मराठी रक्त.
पण पुरंदर म्हणजे काय पोरखेळ होता व्हय अतिशय बलाढ्य असा हा गड लाख संकटे झेलून घेईल असा हां कणखर बुलंद किल्ला. पण मराठे म्हणजे जणू झाडांवर, डोंगरांच्या कपारीत सरसर चढणारी जणू वानर सेनाच कुणी त्यांना शैतान म्हणायचे तर कुणी मावळी भूतं.

फाल्गुन वद्य द्वादशीला निळोपंत आणि त्यांचे मावळ्यांनी छापा घातला. रात्रीच्या झोपेत असणारे यवनी सैन्य खडबडून जागे झाले काहींना हा वेळ देखील मिळाला नाही.
थोडासा प्रतिकार झाला पण वादळाच्या तडाख्यासमोर उभी राहायची आहे का तेव्हा ताकद कुणाची अवघ्या चोवीस तासात पुरंदर निळोपंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतला.

खासा मोगली किल्लेदार शेख रसीउद्दीन निळोपंतानी कैद करून महाराजांकडे पाठवून दिला. या झुंजीत थोडेफार नुकसान झालेच केसो नारायण नर्हेकर देशपांडे धुमश्चक्रीत मारला गेला

पण राजाराम महाराजांचा पायगुण खरोखरच चांगला ठरला त्यांच्या जन्मा पासून अवघ्या बारा दिवसातच हा विजय संपादन करून मुरारबाजींच्या पुरांदाराने स्वातंत्र्याचा श्वास घेतला

14 comments:

 1. मराठ्यांना मार झडप की कर गडप.हेच मराठी रक्त.

  गर्व आहे मराठी असल्याचा ..........

  ReplyDelete
 2. होय मी मराठीच...
  जय भवानी जय शिवाजी

  ReplyDelete
 3. Anonymous20:02

  होय मी मराठीच...
  जय भवानी जय शिवाजी

  dhanya vatale tyani kelela pratap pahun.....

  ReplyDelete
 4. Anonymous00:47

  ...khupch chan..
  your success your hand..wish u all the best for your golden future..

  ReplyDelete
 5. जामदार मिलिंद20:39

  मित्रा मी तुझे सर्व लेख वाचले. माहिती दुर्मिळ आहे . कॉपी पेस्ट करता येत नाही मला शाळेतील मुलांना दाखवायचे असते. शाळेत नेट नाही. तेव्हा कृपया कॉपी पेस्ट कसे करता येयील ते सांग.

  ReplyDelete
 6. Anonymous21:02

  mast ...........

  ReplyDelete
 7. धन्य धन्य इथली माती, धन्य धन्य हा पुरंदर..
  इथे जन्मला सर्जा छत्रपती संभाजी धुरंधर..

  ReplyDelete
 8. Nagesh21:36

  जय भवानी जय शिवराय.........

  ReplyDelete
 9. bala mala tujha khup abhiman ahe. Tujhi ya shorya ran ragini marathi matichya itihasavishaychi talmal Aai Bhavanichya krupene ani Chatrapati Maharaj sahebanchya krupene ashich dhag dhagat raho hich shri charani prarthana. Jai Shivaji Jai Shambhuraje!!!

  ReplyDelete
 10. khupach chhan!!!!
  Jay Bhavani Jau Shivaji ..............!

  ReplyDelete
 11. महाराष्ट्रात मावळ्यांची आज हि कमी नाहि याचा आभिमान आहे

  ReplyDelete