आज पूर्णत्वास आली शिवलंका २९ / ३/ १६६७

सुरतकरांच्या तोंडचे पाणी दुसऱ्यांदा पळवून. महाराज परतीच्या वाटेला लागले , मिळालेली लुट बैलांवर लादून महाराज मनोहरगडाकडे फिरले. महाराज गडावर परतले आणि कुरुटे बेटाकडून गोविंद विश्वनाथ प्रभूंनी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची वार्ता आणली.

सिंधुदुर्ग जंजिरा, जागी अस्मानी तारा जसे मंदिराचे मंडन, श्री तुळशी वृंदावनतैसा महाराजांच्या राज्याचे भूषणपरद आलंकार शिवलंका जंजिरा शिवाजी महाराजांचा.







आनंदित झालेले महाराज किल्ल्याची वास्तुशांत करण्यासाठी सिंधुदुर्गाकडे निघाले. सिधुदुर्गाची वास्तुशांत झाली तो शुभ दिन होता, श्रीनृपशालिवाहन शके १५८९ च्या प्लवंग नाम संवत्सराची चैत्र शुद्ध पोर्णिमा. शुक्रवार दि.२९ मार्च १६६७ यावेळी महाराजांनी कामगारांना मुक्तहस्ते धन वाटले. जाल्दुर्गावर नव्या नेमणुका केल्या. दादंभट बिन पिलंभटास सिंधुदुर्गाचे उपाध्येपण मिळाले. सिंधुदुर्गाची हवालदारी रायाजी भोसल्याकडे सोपविली गेली. गोविंद विश्वनाथ प्रभूंनी प्राण ओतून सिंधुदुर्ग उभा केला होता.. मोत्याचा तुरा भेट देऊन महाराजांनी त्यांची पाठ थोपटली.

Comments

  1. Love your blog! Keep up the good work!

    http://www.w3idea.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब