महाराजांचे महानिर्वाण

राजीयांचे देहवसान झाले ते दिवशी पृथ्विकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभूमहादेवी तळ्यांचे उदक रक्तांबर जाले. पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहले.माझ्या राजाच्या जाण्याने हा तर केवळ सृष्टवर झालेला परिणाम काय अवस्था झाली असेल गडकऱ्यांची.आप्तइष्ठांची रायगड पूर्ण काळवंडला होता, गगनाला भिडलेले टकमक टोक आज ठेंगणे दिसू लागले होते.तेजस्वी सूर्याचा प्रकाश देखील आज मंद झाला होता.

वरंधा घाटाच्या पलीकडून उंच आकाशात मान असलेला राजगड जणू तिथूनच राजेंचे अंतिम दर्शन घेत होता तो राजगड ज्याने पाहिले महाराजांचे तरुणपण, ज्याने पाहिले महाराजांचे जाणतेपण, करतेपण ते शौर्य तो पराक्रम ते धाडस ते अतिउच्च साहस वयाची २५ वर्षे आपल्या डोक्यावर महाराजांचा असणारा हात. राजाराम महारजांचा जन्म, सईबाईंचे निधन, तो त्या कित्येक वादळे धैर्याने सहन करणारा त्या राजगडाचा आज धीर खचला त्याच्या तिन्ही माच्या राजंना शेवटचा मुजरा करत होत्या,बालेकील्ल्याने टाहो फोडला होता २५ वर्ष माझ्या डोक्यावरचा मुकुट असणारा माझा राजा आज मला सोडून चाललाय.

मोहरी एवढ्या बीजातून एखादा वटवृक्ष अंकुरावा व पाहता पाहता त्याने अफाट पसारा मांडावा तसे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा माझा राजा सोडून चाललाय
राजांची शिबिका सजली नेहमी तोफांच्या सरबत्ती आणि ढोल नगा-यांच्या वाद्यांच्या ठेक्यावर मिरवणारा माझा राजाचे आगामन आज होत होते ते आप्तस्वकीयांच्या किंकाळ्यांनी, त्यांच्या नजरेतून घळघळ वाहणाऱ्या आसवांनी. राज्याभिषेकाच्यावेळी मोठ्या रुबाबात मिरवणाऱ्या माझ्या राज्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब थोडा उतरला होता बाजारपेठेतूनचा हा शेवटचा प्रवास परत माझा राजा मला दिसणार नाही हि खंत त्या बाजारपेठेला होती राजवाड्याकडून जगदीश्वर प्रासादाकडे महाराज निघाले होते जगदीश्वर प्रासादासमोर बेलकाष्ठे व चंदन काष्टे ह्यांची चिता रचण्यात आली होती आणि अवघ्या १० - १२ वर्षांच्या राजाराम महाराजांच्या हस्ते महाराजांना अग्नी मिळाला. माझा एक राजा तर गेला पण दुसरा राजा जो पन्हाळ्यावर होता जो वडलांचा शब्द प्रमाण मानायचा,ज्याला शिवेश्वर शिवाय काही सुचायचे नाही त्याला मात्र ह्याची खबरच नव्हती आणि जेव्हा समजली तेव्हा ...
(त्यांच्या दुःखाचा ठाव नाही घेता यायचा)

Comments

  1. are asa raja hone nahi

    raje ya marathi jantela tumchi garaj ahe
    tyasathi

    RAJE TUMHI PUNHA JANMALA YAAAAAA.......
    Rupesh & Vinaya.

    ReplyDelete
  2. The Great Shivaji Raje...........

    ReplyDelete
  3. RAJE TUMHALA MANACHA MUJARA..............

    GARJA MAHARASTRA MAZA


    SAGAR

    ReplyDelete
  4. ASA YUGPURUSH PUNNHA HONE NAHI.

    ReplyDelete
  5. laakh mele tari chaltil pan lakhancha poshinda jaglach pahije

    ReplyDelete
  6. Maharaj Janmala toh Shivneri aani Jithe tyane aaple Praan sodla toh RaiGadh
    He donhi ektra kela shivneri cha Shiv Ani Raigadh cha Rai = ShivRai Raje.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब