राजगड लढा ३० एप्रिल १६६५

शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मुरब्बी राजकारणी आणि जातीने कडवा राजपूत असलेल्या मिर्झाराजा जयसिंगाने जहरी याची निवड करून त्यास दख्खनवर धाडले. लहान वयापासूनच जंग खेळलेला मिर्झाराजा मोठा अनुभवी होता. शिवाजीचा जीव गडकिल्ल्यात नाही शिवाजीचा जीव पैशात नाही तर शिवाजीचा जीव त्याच्या प्रजेवर आहे हे त्याने पुरते ओळखले होते.

एकीकडे दिलेरखान पुरंदरचा हट्ट धरून बसला होता तर इकडे मिर्झा राजांच्या हुक्मावरून कुत्बुदीखान व बलुदिखान हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात हैदोस घालत होते तर दुसरीकडे दाऊदखान मूळ स्वराज्यावरच घाला घालीत होता गावे उध्वस्त करीत होता बेचिराख करीत होता.रोहिडा ते राजगड ह्या भागातील बहुतेक गावे त्याने जाळून टाकली होती. आणि हळूहळू तो पुढे सरकत होता. दिनांक ३० एप्रिल हे सैन्य राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले. यावेळी माहाराजांचा मुक्काम राजगडावरतीच होता. अहो राजगडाला मोर्चा लावणे काय सोप्पे होते. राजगड म्हणजे राजगडच. राजगडावरून तोफा बंदूका आणि बाणांचा प्रचंड भडीमार सुरु झाला.


राजगडचा दुर्गम डोंगराळ टापू राजेंच्या मदतीला आला. डोंगरांच्या मदतीने राजगड चांगलाच भांडला मराठ्यांच्या रेट्यापुढे मोगलांचे काही चालेना अखेर दाऊदखान मागे हटला. त्याने तळगुंजणखोऱ्याजवळ तळ दिला.व दुसऱ्या दिवशी त्याने शिवापूरला पलायन केले.

मोगली फौज अभेद्य अश्या राजगडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचली हे पाहून राजांना ही थोडा धसका बसलाच म्हणूनच राज्याभिषेकासमयी राजधानीचा मान रायगडाला गेला.

तुम्हास तुमचे गौरीशंकर
आम्हास आमचा सह्यकडा
असो हिमालय किती भव्य
तरी मनी पूजीन राजगडा

No comments:

Post a Comment