किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल

२० मे १६७७ च्या दरम्यान राजेंनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. २५ मे १६७७ रोजी राजेंनी वेल्लोर किल्ला वेढला. किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता. त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली. परंतू त्या हबशाने ती धुडकावून लावली. तो कोट होता देखील तसाच कडक, बेलाख
सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन - येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते. तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.

जिंजीचा ताबा कुत्बशाहास न दिल्याने तो नाराज झाला व राजांच्या मदतीला दिलेले सैन्य माघारी गेले वेळप्रसंगी अपेक्षित अशी तोफखान्याची मदत न मिळाल्याने किल्ल्याला वेढा देऊन आतील किल्लेदारास जेरीस आणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, आणि म्हणूनच राजेंनी नरहर रुद्र या अधिकाऱ्यास २ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ देऊन हा वेढा दिला. व राजे शेरखान लोदिच्या समाचारास पुढे निघून गेले.

वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते. कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४ महिने, ६ महिने वर्षे दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग पडले.

मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला १४ महिने कसबसा किल्ला लढवून अब्दुलखान पुरा वैतागला होता. मराठ्यांच्या चिवटपणाची चव त्याने चाखली. अखेरीस किल्ल्यात साथीचा रोग पसरला. विजापूरहून देखील. मदत मिळेना. त्यामुळे रघुनाथपंतांकडून ५० हजार होन घेऊन अब्दुल्लाखानाने वेल्लोरचा किल्ला त्यांना देऊन टाकला. शके १६००, कालयुक्त संवत्सरात श्रावण शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच दि. २२जुलै१६७८ वेल्लोरचा बलदंड गड स्वराज्यात दाखल झाला. यावेळी राजे. रायगडी होते.

संदर्भ -
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
मराठी सत्तेचा उदय - जयसिंगराव पवार
सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद

3 comments:

 1. khup chan Abhishek asach MAHARAJAN baddal lihit raha,nawin pidhila ITIHASACHA wisar padla aahe,tyanna he mahit zale pahije ki te kon aahet,kuthun aale aahet an tyancha ITIHAS kay aahe.kuthlya hi Mansacha,Rajyacha aani Deshacha ITHASA shiway kahihi astitwa nahi.
  JAY HIND
  JAY MAHARASHTRA
  (SWAPNIL RAKHNUDE)

  ReplyDelete
 2. Abhishek.... hats off for u.
  Mala khup khup ved aahe historical novels vachayache... mostly mi tya bhumiketach shirto apoaap...
  Mala kahi kalat nahi kaay lihu te. You are writing beautiful things. Awesome yaar!!!!

  ReplyDelete
 3. Ekdum mast
  Mala Abhiman ahe ki me maratha janmala alo.

  ReplyDelete