फिरांगोजींचा संग्रामदुर्ग १४ ऑगस्ट १६६०

राजं तीकडं पन्हाळ्यावर अडकून पडल्याती, इकडे या खानाने रयतेत डुकरावाणी हैदोस घातलायती त्यामुळे रसद मिळत न्हाय किल्लेदार. बातमी घेऊन आलेल्या नाईकांच्या माणसाने फिरांगोजीना बातमी दिली. स्वराज्य दुहेरी
संकटात सापडले होते विजापुरी सरदार सिद्दी जौहर. पन्हाळ्याला वेडा देऊन बसला होता, आणि औरंगजेबाचा मामा शास्ताखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेटोळे मारले होते. पुण्यापासून चाकण पावेतो सर्व भाग शास्ताखानाने व्यापला होता. त्यामुळे चाकण किल्ल्याला (किल्लेदार - फिरांगोजींना). मदत मिळत नव्हती. राजगडावर जिजाऊ साहेब चिंतेत होत्या.

शास्ताखानास संग्रामदुर्गाला वेढा देऊन ५०चे वर दिवस झाले होते. पण किल्ला तो वश होत नव्हता. जमिनीवरील हा किल्ला, किल्ला किल्ला तो कसला ती एक गढीच. जास्तीत जास्त ४०० - ५०० मावळे राहू
शकतील एवढे ते आवार, हा छोटेखानी एक दिवसात घेऊ याच ऐटीत २१ जून १६६० रोजी खानाने वेढे दिले पण किल्ल्यातील मराठ्यांनी मोगलांशी एकाकी झुंज मांडली होती.मराठ्यांचे धैर्य तिळमात्र ही कमी झाले नव्हते.

किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती.अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. "या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे".

एक दिवस त्याने आपल्या शामियान्यात प्रमुख सरदारांसमवेत एक गुप्त मसलत केली. बेत ठरला किल्ल्याच्या एका बुरुजापर्यंत गुप्त सुरंग खोदून त्यात दारू भरायची आणि बार उडवून टाकायचाअसा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे ते काम मात्र मोगल सैनिकांनी अतिशय शिस्तीत केले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. मंगळवार दि. १४ ऑगस्ट १६६०. रोजी सुरुंगात दारूगोळा भरला आणि आणि दिली वात पेटवून सुरसुर करत ती वाताडी पेटत बुरुजाच्या दिशेने निघाली. आणि क्षणार्धात एकच धमाका उडाला.

बुरुजावरील मराठे आकाशात उडाले.हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली.


खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. खानच्या सैन्यास ते पुढे सरकू देत नव्हते. मारःयान्नाचा आवेश एवढा विलक्षण होता की, अशा विपरीत व प्रतिकूल स्थितीतही पुढे येण्याची हिंमत नव्हती.
उण्यापुर्‍या ३०० ते ५०० मावळ्यांनी २०००० पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही १२ तासांपेक्षा जास्त वेळ. थोपवून ठेवले. शमसुद्दीन खान व राव भावसिंह यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊन दिला नाही.


पराक्रमाची शर्थ व प्रयत्नांची शिकस्त करूनही आता मराठा लढू शकत नव्हता अन् समोरून येणारा. लोंढा कमी होत नव्हता.
राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी'

जणू हे शब्दच फिरांगोजींना आठविले असावेत. आणि म्हणूनच फिरंगोजी नरसाळा यांनी भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरांगोजींवर नाराज झाले नाहीच उलट आनंदाने, त्यांची पाठ थोपटून त्यांचे सांत्वन केले आणि भूपाळगडाची किल्लेदारी राजेंनी फिरांगोजीस बहाल केली.

No comments:

Post a Comment