सुरतेवर दुसऱ्यांदा विजय ३ ऑक्टोबर १६७०

तशा एप्रिल पासूनच महाराज. सुरतेवर चाळून येणार असल्याच्या वावड्या सर्वत्र उठत होत्या. त्यामुळे गुजरातचा सुभेदार बहादूरखान हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ५००० सैन्यासह सुरतेला येऊन थडकला. सुरतेला तो स्वतः बरेच दिवस राहिला. परंतू त्यावेळी महाराज सुरतेवर चाळून गेलेच नाही. पुढे मुअज्जम-दिलेर भांडणामुळे बहादूरखानास सुरत सोडून जाणे भाग पडले. बहादूर खान सुरतेहून निघून गेला आणि सप्टेंबरमध्ये महाराजांच्या हल्ल्याचा संभाव्य वार्ता पुन्हा सुरतेत येऊन धडकू लागल्या. महाराजांच्या धाकाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच दूरदर्शी इंग्रज इंग्रज प्रेसिडेंट जीरॉल्ड आँजियर ने आपली वखार स्वालीला हलविली. पण सुरतेच्या सुभेदाराने मात्र काहीच विचार केला नाही. त्याच्याजवळ जेमतेम ३०० स्वार होते. त्यांच्या भरवशावर तो बेसावध राहिला. बहुधा महाराज येणार नाहीत अशी पक्की खात्री त्याला वाटत असावी.



राजेंचे सुरतेत आगमन
पण त्याचा अंदाज चुकला. व दि. २ ऑक्टोबर १६७० रोजी सुरतेवर वार्ता येऊन थडकली की, १५ हजार फौजेसह शिवाजी सुरतेच्या अलीकडे फक्त २० मैलावर येऊन पोहोचला आहे. महाराज सुरतेवर आल्याची बातमी पसरताच सर्व व्याप्ती सरकारी अधिकारी यांची एकच पळापळ सुरु झाली. सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी किल्ल्याच्या तोफांचा आश्रय घेतला. दि. २ ऑक्टोबर च्या दिवसभर सर्वत्र पळापळ सुरु होती.

दि. ३ ऑक्टोबरला सकाळीच महाराजांनी सुरतेवर हल्ला चढविला. पहिल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या औरंगजेबाने सुरतेला संरक्षक तटबंदी केली होती. महाराज तटबंदीजवळ आले. थोडाफार प्रतिकार मोगलांनी केला पण १५००० हजार फौजेपुढे ३०० सैनिकांच्या पाद तो काय लागावा आणि मग.


सावकारांचे वाडे काबीज करून सोन, रूपे, मोतीं, पोवळे,माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, ,असे नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या , इभ्राम्या, सतराम्या,असफ्या, होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले.
The marathas plundered the larger houses of the city at leisure, taking immense quantities of treasure, cloth, and over valuable goods, and setting fire to several places. so that "nearly half th town" was burnt down to the ground.

परिणाम आणि परिस्थिती
सुरतेच्या या विजयामुळे या शहरांतील रहिवाशांस कैक वर्षे शिवाजीची दहशत अति शय बसली होती. दोन महिन्यांत दहा-पाच वेळा लोकांची पळापळ झाली. तेथील व्यापार बहुतेक बसला आणि हळू हळू इंग्रजांनी सुरत सोडून मुंबईस आपलें मुख्य ठाणे केले.


सुरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.

इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणाऱ्या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने, आणि अशी लुट घडवायची ही दुसरी वेळ होती.
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.

Source-
Shivaji and his times - jadunath sarkar
shakakarte shivray - vijayrao deshmukh
marathi riyasat - sardesai
sabhasad bakhar - krushnaji anant sabhasad

Comments

  1. आजही गुजरातींमध्ये महाराजांविषयी "लुट" विषयी गैरसमज आहेत पण "लुट" महाराजांनी कुणाची व कशाची केली ते अजुनही त्यांना नाही समजल....त्यांचे गैरसमज दुर होण्यासाठी "जानता राजा"चे प्रयोग सुरतमध्ये झाले होते आशा करतो कि लोकांचे गैरसमज त्या माध्यमातुन दुर व्हावेत ही अपेक्षा......!! जय शिवराय !! !! जय शंभुराय !!

    ReplyDelete
  2. nice article abhishek keep it up

    ReplyDelete
  3. jya chuka haramdashi bamanani kelya aahet tya sudarun lut shabdha aeyvaji surat jinkali ashi karavi ashi vinanti mi karato. shivaji maharajavar apali prachand nishta asun tevadi chuk durust karavi.

    ReplyDelete
  4. देवगिरी किल्ल्यावर मुघलांनी खुस्खोरी केली.स्वबळावर नव्हे तर फितुरीने.तरी लिहणार कि मोघलांनी देवगिरीचा किल्ला जिंकला. या किल्ल्यावरील अमाप संपत्ती (दौलत) लुटून .या कुल्याचे नामांतर देवगिरी ऐवजी दौलताबाद केले.तरी "मोघलांनी देवगिरी किल्यास जिंकिले" असे वर्णन.
    या उलट,छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातून जाऊन ,गुजरातमधील सुरतेवर स्वारी केली.
    रयतेला कोणताही त्रास होऊ न देता. त्यांनी सुरात स्वबळावर जिंकले.त्यांच्या शौर्याच्या धास्तीने
    इंग्रजांनी आपली वखार हलविली.जिंकून आणलेली संपत्ती लोहगडा वरील लक्ष्मि कोठीमध्ये सुरक्षित ठेवली.व त्याचा वापर दुर्ग बांधणीसाठी/रयतेच्या स्वरक्षणासाठी केला.सुबेदाराच्या सुनेला इज्जतीने ,सन्मानपूर्वक साडी-चोळी ने परत पाठवणी केली.
    असे असतानाही शिवरायांनी सुरात लुटली.असा उल्लेख करणे अत्यंत चुकीचे आहे.

    ReplyDelete
  5. ANI SUARAT JINKLI , HYA MADHLLE SAGLI SAMPATI HI HINDUSTANATLYA GOR GARIB LOKANKADUN MOGHLANI LUTLELICH HOTI ,TICH SHIVAJI MAHARAJANI PARAT MILAVLI .
    JAY BHAWANI ,JAY SHIVAJI !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब