शंभूराजांचे बुद्धिचातुर्य


औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंतसिंगाकडून काढून घेउन आपला मुलगा. मुअज्जम यास दिली. मुअज्जम ला शिवाजी राजांशी दुश्मनगिरी नको होती. आणि आपला मुलुख उभा राहीपर्यंत मुघलशाहीची हातघाई राजेंनाही नको होती. त्यांनी दख्खनसुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावली. ते देखील आपला छावा शंभूराजे यांना मध्यस्थानी ठेवून त्याबद्दलची फर्माने, खलिते केव्हाच दिल्लीला रवाना झाली होती.

राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलुख मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शहाआलाम मार्फत राजांना औरंगजेबाचा ह्स्बुल हुक्म आला तो शंभूराजांच्यासाठी. आता शंभूराजे शाही मनसबदार झाले. औरंगजेबाने आपला पुन्हा एकदा धूर्त डाव टाकत जहागिरीचा मोकासा बहाल केला तो वऱ्हाड खानदेशाचा त्यामुळे नाईलाजाने शंभूराजांना औरंगाबादला रहावे लागणार होते. महत्वकांक्षी पित्याच्या एका राजकारणाखातर शंभूराजे औरंगाबादेस गेले. सोबत प्रतापराव, निराजीपंत, रावजी हे सरदार देखील होते.

शंभूराजे व मुअज्जम यांच्या भेटी झाल्या. परत परत भेटी घडत राहिल्या. दोघांची मैत्री वाढली. आपल्या वतनाचा राबता लावून शंभूराजे राजगडी परतले. त्यांच्या वतनाचे काम प्रतापराव व निराजीपंत हे पाहत होते शंभूराजेंनी आपल्या लहान वयातच अनेक मोठें मोठें पराक्रम केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि थोरल्या महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. त्यातीलच एक म्हणजे मुअज्जम आणि महाराज यांतील सख्य वाढीस लावले.

महाराज आणि मुअज्जम यांचा घरोबा वाढत होता. परस्परे वस्तभावा धाडू लागले. आणि नेमक्या याच कारणामुळे धूर्त औरंगजेब अस्वस्थ झाला होता त्याचा डोक्यात भलतीच राजकारणे रंगत होती. महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास गेले त्यावेळी त्यांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने शाही खजिन्यातून एक लक्ष रुपये दिले होते. आता औरंगजेबाची लहर फिरली व त्याने हा खर्च शंभूराजांच्या वऱ्हाडातीळ नव्या जहागीरीतून वसूल करून घेण्याचा हुकम त्याने काढला. शिवाजी नाहीतर त्याचे जमेल तेवढे सहकारी गिरफ्त करावे असा डाव औरंगजेबाने टाकला. त्याने तह उधळून लावण्याचे ठरविले. व मुअज्ज्मला गुप्तपणे पत्र पाठविले की,

शिवाजी हरामी आहे. याचा सरदार प्रतापराव व निराजीपंत हे दोघे फौजेनिशी आहेत. याकरता त्यांस पातेजो नये. एखादे वक्ती दौलाताबादेस भेद करतील. तरी तुम्ही या दोघास कैद करणे. त्यांची घोडी तबेल्यात लावणे. ये विषयी रयात न करणे.

शहजादा मुअज्जमला एक वकील नेहमी दिल्ली दरबारी असे. त्याने आपल्या मालकास तातडीने उपरोक्त आशयाचे पत्र रवाना होत असल्याची पूर्वसूचना दिली त्यावरून महाराजांचे वकील निराजीपंत यांस एकांती बोलावून मुअज्जमने त्यांना दुसऱ्याच दिवशी. पळून जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मराठे दुसऱ्याच दिवशी राजगडी निघून गेले.

ही गोष्ट घडली दिनांक डिसेंबर १६६९ रोजी.

केवळ शंभूराजांच्या बुद्धीचातुर्याने मुअज्जम ने असे केले. त्यांच्यामुळेच मराठी रीयासतेचे दोन बडे सरदार व २५०० मावळे सुखरूप स्वराज्यात दाखल झाले.

9 comments:

 1. sundar mitra tu ahes mhanun amhi ahot

  ReplyDelete
 2. kharach sunderach

  ReplyDelete
 3. जय शंभूराजे!! जय शिवराय !!

  ReplyDelete
 4. यालाच तर म्हणतात गनिमी कावा !!
  महाराजांची युद्धनीती जशीच्या तशी शंभूराजांनी आत्मसात केली ...

  -सह्याद्रीचा छावा.

  ReplyDelete
 5. Anonymous01:50

  This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 6. mitra bharri....

  ReplyDelete
 7. Anonymous02:12

  होऊन गेले या जगतात राजे अनेक ,
  गणतात एकच राजा या जगतात नेक,

  तो आहे सह्याद्रचा छावा,
  त्यालाच माहितीये मराठ्यांचा गनिमी कावा,
  लढला तो मातीसाठी, मरण पावला तो स्वराज्यासाठी !!

  जय शंभू !! जय शिवराय !!
  Amey Ghadge
  143amay@gmail.com

  ReplyDelete
 8. सावरकरांनी छत्रपतिन्बद्दल खुप लिखाण कल आहे आपण येथून ते मिलवू शकता :http://www.savarkarsmarak.com/

  .......................................पराग देशमुख .

  ReplyDelete