एक फसलेला डाव

मोगली सैन्याशी निकराची पंजेफाड करत मावळी सेना लढतचं होती कारण परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ मानणारी ही स्वराज्य सेना.

काळ होता १६९९ चा राजाराम महाराज गादीवर येऊन बराच काळ लोटला होता. मराठे सगळीकडेच मोघलांना धूळ चारत होती. भाउबंदकी नडली दुहीचा शाप पुन्हा एकदा दिसून आला.

एक लढवय्या आणि जिगरबाज सेनापतीस आपल्याच लोकांनीच दगा करून मारले होते. त्यांचे नांव संताजी घोरपडे.

पण धनाजी नावाचा वाघ अजून मैदान गाजवतच होता. मोगलांच्या प्रतिष्ठित सरदारांना धनाजी जाधव यांनी मेटाकुटीस आणले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द बादशाही छावणीवरच हल्ला करून

एकच खळबळ उडवून दिली होती. शत्रू नुसतं त्यांच्या नावानं चळाचळा कापयचा. ३ नोव्हेंबर १६८९ साली रायगड पडल्यावर तह करून बंदिवासात जाणाऱ्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब
आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे अजून मोगलांच्या बंदिवासातच होते.

राहून राहून ही गोष्ट मराठ्यांना सतावीत आणि त्यातूनच काही धाडसी बेत आखले जात. काही करून शाहूंना मोगली बंदिवासातून बाहेर काढायचेच असा त्यांचा बेत. परंतू नुकताच दस्तुरखुद्द बादशहाच्या छावणीत या पठ्ठ्यानं धुडगुस घातल्याने मोगल कमालीचे घाबरले होते आणि ही जणू शाहूंना असंच छापा मारून सोडून नेणार अशी ताकीद देण्याची पूर्वसूचना म्हणून सतर्क बनले होते. त्यामुळे छावणी भोवताली सैन्याचा वेढा पक्का बसवला होता.

१९ डिसेंबरच्या बातमीनुसार बादशहाने गनिमांच्या परीपत्यासाठी बक्षीउल्मुल्क बहरामंदखान, फत्तेहुल्लाखान, मतलबखान व खुदाबंदाखान वगैरेंना नेमेले.

इकडे मावळ्यांचा बेत ठरला आणि बेत शिजवण्याचा दिवस देखील. धनाजी जाधवराव आणि त्यांचे निवडक सहकारी (जास्त पुरावे उपलब्ध नसल्याने मावळ्यांची संख्या अचूक सांगता येत नाही आणि काळ देखील तरीही तर्क) - मध्यरात्रीच्या काळोखात आपले इतर सहकारी मोजक्या अंतरावर ठेवून मोजक्या दोन-तीनशे सैन्यानिशी ब्रम्हपुरी येथील बादशाही छावणीवर झडप घातली बिनबोभाट कत्तली चालू केल्या.

काही मोगल पळू लागले काही ओरडू लागले अचानकच छावणीत गोंधळ माजला. धनाजी आया धनाजी आया भागो भागो अशा आरोळ्या उठत होत्या. खासे मोगली सरदार तंबूतून बाहेर येत नव्हते. अचानक झालेल्या हल्ल्यात सारे गडबडले पण मोगलांचे सैन्य जास्त असल्याने. धनाजींना काढता पाय घ्यावा लागला.

तेव्हा जर शाहू महाराजांची सुटका झाली असती तर आज इतिहास काही वेगळाच असता.

हा प्रसंग घडला तो दिवस होता 22 डिसेंबर १६९९

Comments

  1. he vachun etihasat gelya sarakh vatal.....mast re mitra keep it up :)

    ReplyDelete
  2. SANTAJI DHANAJI ....ROCKS...!

    ReplyDelete
  3. शूर असे लढवय्ये या स्वराज्यास लाभले, त्यामुळेच स्वराज्याचे तोरण बांधायला महाराजांस शक्य झाले अशा शूरवीरांना शतशः प्रणाम !!!!

    ReplyDelete
  4. Anonymous04:16

    धनाजी जाधव रणात दिसता
    शत्रु पळे प्रतिबिंब बघता
    घोडं नाही पाणीच पिणार
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार

    ReplyDelete
  5. Anonymous04:51

    You hv provided us the great information as always..thanx for revealing such mysteries..Jai bhavani jai Shivaji..!!

    ReplyDelete
  6. शतश: प्रणाम वीर मावळ्यांना.
    खुपच छान.

    ReplyDelete
  7. Anonymous19:55

    great friend. . . Today great day. . . We should hv to remember them. .

    ReplyDelete
  8. Anonymous11:16

    छान! उत्तम आणि स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब