देसूर मुक्कामी जुल्फिकारचा समाचार


हा काळ होता १६९२चा मराठे पळवून पळवून मोगलांना मारत होते. संताजी धनाजी, असे सारेच वीर शर्थीने राज्य राखत होते. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजे राजाराम महाराज यावेळी जिंजीस होते आणि जिंजीस औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष याचे वेढे पडले होते परंतू त्याचे आणि राजाराम महाराजांचे संबंध अगदी चांगले झाले होते. *(बापाच्या मृत्यू पश्चात गादीसाठी होणाऱ्या भांडणामध्ये मराठ्यांनी आपली बाजू धरावी यासाठी ) त्यामुळे तो वेढा देऊन बसलाय असे कधी वाटच नसे.

जिंजी पासून वांदीवॉश हे ठिकाण सुमारे २५ मैल दूर आहे. तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती मराठे मोगलांनी तिथपर्यंत जाऊ देत नव्हते मोगलांचे पहिले २ प्रयत्न फसले पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश आले. जुल्फिकार खान. ते अन्नधान्य घेऊन पुन्हा आपल्या तळाकडे निघाला. मार्गात देसूर *(जिंजीपासून १३ मैल ईशान्येस) या ठिकाणी संताजीने आपल्या २० हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढविला

मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भीमसेन लिहितो.

....जुल्फिकार खान प्रत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते. त्यांनी मोगलांची वाट अडविली. मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळलीआणि त्याने शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्याच दिसावी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यांनी निकराचे हल्ले चढविले. त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगलांच्या सोबत अस्केके वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांची बंदुकी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फिकारखान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या. आम्ही कुच करीत असताना. वाटेत भातशेते लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल. आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले. आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली .


पळता भुई थोडी केली या मोगलांची मराठ्यांनी सह्याद्रीच्या कुशितले हे वाघबच्चे कर्नाटक जिंजी सारख्या परराज्यात देखील पराक्रमाचे तमाशे दाखवीत होते आपली तलवार गाजवीत होते. गुलामी मराठ्यांच्या रक्तातच नाही म्हणून राजाशिवाय प्रजा कित्येक काळ झगडत होती. त्या रावदलपत ला सुचेना काय करायचे. जुल्फिकारखान तर पाठीला पाय लावून पळत सुटला त्यांचे सैन्य चहू बाजूला आपला जीव मुठीत धरून पळत सुटले होते पळताना सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य होते
भागो ....! भागो... संताजी आया

ही लढाई घडली जेव्हा घडली तेव्हा तारीख होती. ५ जानेवारी १६९३....

Comments

  1. nice collection abhi, thans 4 posting this

    1 marahatta.mavala manaje janu swata ha shivaji maharajch hote.

    ReplyDelete
  2. GR8
    im intrested in our history bt na aamchya abhyaskramat marathyancha itihas ahe n aamhala koni aaplyaitihasatil goshti sangnare koni nahi
    seriously thnx dada

    ReplyDelete
  3. अभिषेकराव.... हि माहिती share केल्याबद्दल धन्यवाद...
    संताजींचा हा पराक्रम मला माहित नव्हता..
    वाचताना रक्त सळसळत होते.
    जय जिजाऊ|| जय शिवराय|| जय शंभूराजे||

    ReplyDelete
  4. kharach khupach chan ya gosti attachya pidhila mahit nahit tya tumchya marfat amchya paryant pohachat ahe tyabaddal dhanyawad.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब