संभाजी राजेंचा राज्याभिषेक वास्तवता आणि रंगवणूक

बुधवार २९ जुलै १६८० ला ललितापंचमीचे औचित्य साधून संभाजी महाराजांनी आपणास मंचकारोहण सविध करून घेतले. परंतू त्याकाळी असलेल्या अस्थिर वातावरणात झालेल्या राजाभिषेकात त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्याधीकाऱ्यांना तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे संभाजीराजांवर ऐंदऱ्याभिषेक करवून हिंदवी राजसिहासानाची कायम प्रतिष्ठा करणे इष्ट वाटले आणि त्यांनी तो महाराजाभिषेक नंतर माघ शुद्ध ७ रविवार १६ जानेवारी १६८१ रोजी केला संभाजी राजे या मराठी रियासतीचे दुसरे धाकले धनी झाले.

याच काळात स्वराज्यावर आदिलशहा, मोगल व सिद्दी यांचे जोराचे अपघात चालू झाले होते. अशा गडबडीत राजाभिषेक उरकून घेण्याची निकड त्यांनी केली नसती. परंतू शिवाजीराजांचे क्रियाकर्म दोनदा करावे लागल्याने व "प्रथमाभिषेक" ही विष्णुसुप्तीतच करून घ्यावा लागल्याने या मंचकारोहणाचा संस्कार तितकासा समाधानकारक वाटला नाही. उलट राजारामराजांसही तसाच संस्कार घेऊन गेल्याने शास्त्राचा व धर्माच्या अडचणी उपस्थित. होऊन राहिल्या होत्या. त्यामुळे ह्या सर्व अडचणी दूर करून राजसिंहासनाचा निर्वेध भोक्ता होण्यास जसा शिवाजी महाराजांस संस्कार करून घ्यावा लागला तसाच संभाजीराजंसही ऐंदऱ्याभिषेकाचा संस्कार करून घेणे व दुहीचे मूळ काढून टाकणे जरूर झाले होते.

संभाजी राजांचे चरित्र बदनाम करण्यास अग्रेसर असणाऱ्या मल्हार रामराव या राजाभिषेकाप्रसंगी तरी मागे राहिलच कसा, तो लिहितो: "माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती, व पुरंधर शांतीहोम करून नंतर अभिषेक होऊन सिंहासनरूढ जाले" यात तिथीवाराशी जसा मेळ नाही तसाच दिवसाचाही घोटाळा याणे केलेला आहे.

अर्थात मल्हार रामरावाचा सर्व मजकूर पूर्णपणे चुकीचा आहे. आता त्याचे कथाथाटाचे काल्पनिक भाष्य पाहा : सूर्यदर्शन व्हावे ते अस्तमानापर्यंत अभ्र येऊन न झाले. "प्रथम सूर्यदर्शनाचा या विधीत काहीही संबंध नाही. आणि माघात (फेब. मार्च) मल्हार रामरावाची काल्पनिक परिस्थिती असण्याचा संभाव अगदीच कमी. "सिहासानावरून उठोन रथावर बसले. तेथून काळपुरुष मारावा म्हणून निघाले मार्गी रथ मोडला. तसेच हत्तीवर स्वार होऊन मिरवत समारंभेकरून महालात आले तेथून यज्ञशाला केली होती तेथे कबजीच्या सांगण्यावरून ...तुळा केल्या. अष्ट प्रधान यांचे सन्मान वस्त्रे अलंकार देऊन ब्राम्हण तीस-चाळीस हजार जाले. त्यांस दक्षणा (देऊन) ब्राम्हणभोजन करविले. तेव्हा दक्षणेचे दाटीत काही ब्राह्मणही मेले...

आता या मल्हाररावाचे अज्ञान पाहा.
ह्या विधीस सर्व विधी आटोपल्यावर सिंहासनरोहण करावयाचे असते परंतू मल्हार रामराव सांगतात काय?
म्हणे तुलादान प्रसंगी काही ब्राम्हण मेले. परंतू तत्कालीन लेखकांच्या लिहिण्यावरून व तुळादान विधीच्या प्रयोगावरून हे तुळाद्रव्य सर्व ब्राम्हणांना वाटायचेच नसते. फक्त विधीसाठी उपयोजिलेल्या थोड्या ब्राम्हणांना त्यांच्या अधिकारपरत्वे वाटून द्यावयाचे असते. शिवाय तुलादानविधी १५ दिवस पूर्वीच झाला होता.

अनेकांनी संभाजी कादंबरी वाचली असेलच त्यात देखील राज्याभिषेक प्रसंगी काही असेच वातावरण दिले आहे. बरेच ब्राम्हण मारतात व सर्वजण कवी कलश यांना शिव्या देत रायगड उतरतात वैगरे......

14 comments:

 1. अभिषेक खुप सुदंर ........तुझ्या प्रतेक कामात आमचा सदैव पाठिबां आहे...माझे धाकले धनी राजे झाले

  ReplyDelete
 2. Anonymous19:22

  खरच मराठ्यांच्या इतिहास अजून किती वेगळा असणार आहे काय माहिती मित्रा तुझे काम असेच चालू ठेव
  जय शंभूराजे

  ReplyDelete
 3. chan re bhava tuja mule amhala amacha khara etiyash kalatoy tacha anada ahe mala kam suru dhev k ami ahe tuja barobar ........

  ReplyDelete
 4. "संभाजी" वाचताना या माहितीची नक्कीच दाखल घेईल मी..

  धाकल्या धन्याचा इतिहास आता आपण सुधारायचा आहे अभिषेक....

  ll जय जय शिव-शंभो ll

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच मित्रा नक्कीच

   Delete
 5. Sambhaji Maharajanbaddal ajun barech gairsamaj ahet... ya baddal khup vait vatale... Vishwas patil yanchi Sambhaji hi kadambari mi vachali ahe.. tyat bramhane melyacha ullekh ahe, pan tyache karan ase dile ahe ki, Brahman lok dakshina ghenyasathi gardi karatat ani dakshin / daan denyachya veli ekach jumbad udate ani chengara-chegari hote... Ase dile ahe....
  Abhishekrao... Good work.... keep it up..
  --
  Thanks,
  Rushikesh Shinde

  ReplyDelete
 6. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते नाराज झाले होते कारण की त्यांनी समर्थांना निमंत्रण पाठवले होते परंतु समर्थांना येणे झाले नाही. शिवाय ज्या काशीच्या गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्यांनीच आपला राज्याभिषेक करावा अशी महाराजांची इच्छा होती परंतु गागाभट्टांनाहि येणे झाले नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. Anonymous05:12

   SAMBHAJI RAJE MAHAN HOTE PAN TYANCHYA ITEHAS MALA ITKA THAUK NAHI

   Delete
 7. mitra karya chalu thev swarajya-suryache grahan apanach bajula kele pahije jai shmbhaji!!!

  ReplyDelete
 8. अभिषेक छान काम करतोय..

  ReplyDelete
 9. Anonymous11:24

  अभिषेक धन्यवाद. इतिहासकाळापासून संभाजीराजेंवर अन्याय केला जातोय. ठराविक इतिहासकारांनी तसा तो शिवरायांवरही केला. आपल्या ज्ञातीश्रेष्ठत्वासाठी हे असे विकृत कृत्य आजवर केले होते. जशी नवी माहिती पुढे येईल तसे अनेक (पसरवलेले) गैरसमज दूर होतील. खूप शुभेच्छा.

  ReplyDelete
 10. Anonymous18:33

  स्वराज्याच्या रुद्राला...
  भवानीच्या बालभूत्याला...
  भोसल्यांच्या राजवारस्याला....
  काव्य करणाऱ्या कवी मनाला...
  बाल वयातच ग्रंथ रचणाऱ्या कादंबरीकारांना...
  ... स्वराज्यासाठी ओलीस राहणाऱ्या...
  मुघलांना शब्दानेच गार करणाऱ्या....
  पाच पातशाहींना पाणी पाजणाऱ्या....
  पराक्रमानेच दुसरे छत्रपती होणाऱ्या....
  औरंग्याला बोडक्या डोक्याने फिरायला मजबूर करणाऱ्या....
  मृत्यूलाही शरणागती पत्करायला लावलेल्या....
  माझ्या शंभू महाराजांना...
  माझा मानाचा मुजरा मुजरा मुजरा...

  ReplyDelete