महाराज शहाजीराजे


शहाजीराजेंना हद्दपारी झाली आणि ते बंगळूरास राहू लागले. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजेंना आपल्या मायभूमीपासून दूर ठेवण्यात आले. इकडे महाराष्ट्रात त्यांच्या मनी असलेला स्वराज्याचा ध्यास त्यांचा पोर जिवाच्या बाजीने पुरा करीत होता. शिवाजी राजे ५ फेब्रुवारीला सुरत जिंकून राजगडी आले येताना त्यांना वाटेतच खबर मिळाली की महाराजसाहेब शहाजीराजे देवलोकी गेले.

शके १५८५ च्या माघ शुद्ध पंचमीस (दि. २३ जानेवारी १६६४) शहाजीराजे घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी निघाले. त्यांच्यासोबत नेहमीची मंडळी होतीच. जंगलात शिरताच राजांनी एक श्वापद हेरले. पण शिकार द्रुतगतीने निसटून जावू लागले. तेव्हा राजांनी तिचा घोड्यावरून पाठलाग केला. घोडा बेहनिहाय दौडत सुटला. दुर्दैवाने, थोडे पुढे जात नाही तोच, घोड्याच्या समोरचा एक पाय एका खळम्यात अडकला. घोडा अकस्मात अडखळला आणि राजे घोड्यावरून खाली फेकले गेले. त्यातच त्यांचा एक पाय रिकिबीत पक्का अडकून पडलेला होता. एरवी राजांची इमाने इतबारे राखण करणारा त्यांचा घोडा आज मात्र नेमका पक्का बेफाम झाला होता. त्याच्यासोबत शहाजीराजे सुमारे एक फर्लांगभर फरफटत ओढले गेले. राजांचे वय यावेळी सत्तरीचे होते. वृद्धावस्थेत त्यांना हा जबर मार लागला. ते तत्काळ बेशुद्ध पडले.

एक फर्लांगावर घोडा थांबला. सोबत असलेली सर्व मंडळी राजांकडे धावत आली. बेशुद्धावस्थेत राजांवर उपचार केले गेले. पण वर्मी जबरदस्त मार लागलेला होता. त्यामुळे शहाजीराजे अंतरले ते कायमचेच हा अशुभ दिवस होता शनिवार !

2 comments:

 1. श्रीमंत शहाजीराजेयांना शिरसाष्टांग दंडवत !!
  शहाजीराजांच्या पवित्र स्मृतीनाविनम्र
  अभिवादन...

  ReplyDelete
 2. Anonymous04:07

  शहाजीराजांच्या पवित्र स्मृतीना विनम्र अभिवादन..

  ReplyDelete