रयतेवर जीवापाड प्रेम करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी कष्टकऱ्यांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या निर्दालनासाठी शस्त्रे हातात घेतली. छत्रपती श्री. शिवाजी राजेंनी अनेक लढाया जिंकल्या अनेक किल्ले जिंकले नवनवीन प्रदेश काबीज केले. हे आपण अनेक पुस्तकांतून वाचले आणि आपण स्वतः लिहिली सुद्धा. पण ह्याचं चक्रवर्ती राजाचे आपल्या प्रजेच्या प्रती असणारे प्रेम, तळमळ फार कमी लेखात वर्णन केलेली दिसते.

सदैव रायेतेची काळजी वाहणारा हा राजा जगाच्या पाठीवर असा कोणी राजा असणे क्वचितच. राजेंच्या उपलब्ध असणाऱ्या पत्रांवरूनच त्यांची रयतेप्रतीची तळमळ दिसून येते.

ऑक्टोबर १६६२ साली शाहिस्तेखान पुण्यात धुमाकूळ घालत असता. रयतेची कशा प्रकारे काळजी घ्यावी ह्या विषयीचे २३ ऑक्टोबर रोजी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहीले होते. त्यातील मजकूर - " मोगल प्रस्तुत तुमच्या तापियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेवाळे समतर तमाम रयेती लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे... गावचा गांव हिंडोनी रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे."

शिवरायांनी रयतेला जसे स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले तसेच आपल्या कष्टकरी सहकाऱ्यांना देखील जीवापाड जपले शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, "औसध घेऊन शरीसासी आरोग्य होई ते करणे उपचाराचे विशी आलस न करणे...

अशी शिवछत्रपतींची अनेक पत्रे आहेत ज्यातून शिवरायांचा प्रेमळपणा , संवेदनशीलता, वक्तशीरपणा आणि शिस्त दिसून येते.

रयतेवर प्रेम करणारा हा राजा आपल्या सैन्याकडून सुद्धा कधी रयतेला त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होता. ५ सप्टेंबर चे हे पत्र


म्हणूनच म्हणतात ना जगात बरेच राजे शासनकर्ते होऊन गेले,जगज्जेते होऊन गेले. ज्यांनी अनेक प्रदेश पादाक्रांत केले, नवनवीन जहागिरी मिळविल्या, ज्यांनी राज्य केले भूमीवर पण अख्ख्या जगात एकच राजा असा होऊन गेला ज्यांनी राज्य केले ते लोकांच्या मनावर. आणि म्हणूनच आज ३५० वर्षे झाले तरी आमुच्या मनात शिवाजी जिवंतच आहे.

पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा..........................

2 comments:

  1. jay bhavani jay shivaji!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. आजचे राज्यकर्ते खरचं महाराजांसारखे रयतेशी एकनिष्ठ आहेत ?..हा प्रश्न खरचं अनुत्तरितच आहे...

    "मनासारखा राजा,लोकराजा...अशा या राजाला मनाचा मुजरा !!!!

    ReplyDelete