स्वराज्य तोरण औरंग्याच्या हाती

११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून यावे लागले.


डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नावनाबिशहागडअसे ठेवले.

औरंगजेब बादशहाने राजगड जिंकल्यानंतर त्याने आपला मोर्चा, कानद खोऱ्यात असणाऱ्या तोरणा किल्ल्याकडे वळविला. २३ मार्च १७०३ रोजी तेरबियत खानाने किल्ल्याला मोर्चे लावले. तोरणा हा किल्ला समुद्र सपाटीपासून ४६०६ फूट उंचीचा आहे.त्यामुळे आकाशाला भिडल्यासारखा दिसतो. झुंझार माची बुधला माची अशा गडावर दोन माच्या आहेत.किल्ल्या भक्कम तटबंदी असुन सभोवताली खोल दर्या आहेत . किल्ल्याचे कडे इतके ताशीव आहेत की, कड्यावरून कोणालाही वर चढणे शक्य नाही.

भितीसारखे सरळ असलेले कोळेकळे, खोल दर्या, अरुंद वाटा, भक्कम तटबंदी, बुलंद दरवाजे, दोन मैल लांब अर्धा मैल रुंद गडाचा विस्तार, यामुळे लढाई करून तोरणा किल्ला घेणे शक्य नव्हते. झुंझार माचीवरून गडाखाली उतरायला एक वाट असून ति इतकी अवघड आहे की, कड्यांच्या खबदाडात हाताची बोटे पायाने तोल सावरीत वर चढणे लागत. गडावर जि मराठा शिबंदी होती ति गडाच्या नैसर्गिक रचनेमुळे निर्धास्त अशी होती.

परंतू मोगल सरदार अमानुल्ला खान याने किल्ले चढून जाण्यात वाक्बगार असणारे कांदन खोऱ्यातील काही भाडोत्री मावळे गोळा केले. किल्ल्यावर दोर लाऊन प्रथमत: दोन तीन भाडोत्री मावळे वर तटावर चढले. मग त्यांनी बाकीच्यांना वर बोलविले त्यामुळे अमानुल्ल्खानाचा भाऊ अताउल्लखान इतर मोगल सैनिक वर चढले. मग त्यांनी एकच यलगार करून किल्ल्यातील शिबंदीवर हल्ला केला.

दरम्यानच्या काळात हमीदुदिन खान हा आणखी मोगली सैनिक घेऊन किल्ल्यात आला किल्ल्यातील शिबंदीशी मोगलांची हातघाईची लढाई चालू झाली. मोगल सैनिकांची संख्या वाढू लागल्याने मारठ्याना शरण येण्याशिवाय मार्ग राहिला नाही. मराठ्यांना मोगलांनी अभय देऊन किल्ल्याबाहेर जाऊन दिले. मोगलांनी किल्ला जिंकून परंतू त्यांना भातोत्री मावळ्यांनी मदत केल्यामुळे मराठ्यांनी किल्ला गमवला. दि १० मार्च १७०४ रोजी तोरणा मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाने तोरण्याचे नावफतेहुल्ल्गैलअसे ठेवले.

No comments:

Post a Comment