नेतोजी पालकर


छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर स्वतःची आणि आपल्या इतर सहकाऱ्यांची यशस्वीरित्या सुटका करवून घेत, औरंगजेबाने आपल्या मनोमन रचलेले घातपाताचे मनसुब्यांवर पाणीच पडले. राजे निसटल्या नंतर औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांस तातडीने फर्मान रवाना केले व नेतोजी पालकारास हिकमतीने पकडून हुजूरकडे रवाना करण्याची आज्ञा केली.

महाराज निसटून गेल्याचे समजताच नेतोजी मिर्झाराजांकडून पळून जाईल व महाराजांना सामील होऊन पुन्हा उपद्रव सुरु करेल अशी सार्थ भीती बादशहाला वाटत होती. मिर्झाराजांचा मुक्काम यावेळी भूम या गावाजवळ होता. तर नेताजी पालकर धारूर इथे छावणी देऊन होते. मौज अशी की, महाराज आग्र्याहून निसटण्याच्या थोडे दिवस आधी नेताजींना सुपे परगण्याची मोकासादारी मिर्झाराजांनी बहाल केली होती.

परंतू ग्रह फिरले आणि औरंगजेबाच्या फार्मानानुसार नेतोजी पालकर अकस्मात कैद झाले. मिर्झाराजांनी नेताजींना त्यांच्या पुत्रासह दिलेरखानाच्या हवाली केले. न दिलेरखान दुसऱ्याच दिवशी नेताजींना घेऊन तडक दिल्लीला निघाला. नेताजी कैद झाल्याची वार्ता आलमगीरास २६ सप्टेंबरलाच समजली.

त्यास थोडाफार आनंद झाला. सिवा सुटला निदान नेतु तरी सापडला हे समाधानही त्याला कमी वाटत नव्हते. झालेली चूक आता पुन्हा होणे शक्य नव्हते. नेताजींच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. आतोनात हाल अपेष्टा यांचं पाढा रोजचाच चालू झाला.

अखेर तुरुंगातील असह्य जाचापायी नेताजींनी मुसलमान होण्याचे कबूल केल. त्यांनी फिदाईखानामार्फत औरंगजेबास अर्जी केली की, 'आपले प्राण वाचत असतील तर आपण मुस्लीम धर्म स्वीकारण्यास तयार आहोत'. औरंगजेबाने या अर्जाला आनंदाने मान्यता दिली. इ.स. १६६७ च्या १५ फेब्रुवारी ला नेताजींची सुंता करण्यात आली.

दिनांक १७ मार्च १६६७ रोजी, मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना ३ हजारी जात व २ हजारी स्वरांची मनसबदारी तसेच मुहम्मद कुलीखान हा किताब देण्यात आला

काही ठिकाणी नेताजींच्या धर्मांतराची तारीख २७ मार्च १६६७ अशी नोंदवली आहे

No comments:

Post a Comment