जन्म क्षण एका अद्वितीय योध्याचा १४ मे.

पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणवया, करंजेल पिऊन वातीवाराच्या ज्योती जागवू लागल्या. राउळाचा गाभारा उजळून टाकला. दरुणीमहालातील बाळंतीणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाज्यासमोर आई जगदंबे, आई जगदंबे असे पुटपुटणे चालूच होते. त्या होत्या जिजाऊसाहेब! जगदंबेला स्त्री-जातीच्या स्वरूपात पडलेले सर्वांत गोमटे स्वप्न!

उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाज्यासमोर येरझाऱ्या घालीत होत्या. दहाबारा हात शेजारीच पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. दिवस चांगला दीड कासरा धावनी घेऊन वर चढला 

एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला/ आऊसाहेब बिगीबिगी दरवाज्याच्या रोखानेपुढे सरशी झाल्या. उरातल्या सगळ्या 'आऊपणान' त्यांच्या कानांत जमाव केला. अनेक सवाल डोळ्यांत खडे ठाकले.
दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके , राजस रडणे धावणी घेत उघडल्या दरवाज्यात मध्यानं वयाची कसबी सुईण-गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उरफाटे फिरवले होते.

तापल्या दुधावर दाट सं जमून यावी तसें नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीचं जवाब पेश झाला

"झडू द्या तोफांची नौबत! बाळकिसन आलं...! बाळ बाळातीन सम्दं सुकरूप...

नेताजी रावांनी जोत्यावरून खाली छलांगचं घेतली.  आऊसाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले " बुरजाबुरुजांवरच्या भांड्यांस्नि बत्ती देतो आऊसाब ! धाकली धनी आलं. ! हु दे जगदंबेचा उदो !

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६