पेटली स्वातंत्र्याची ज्वाळा

ही कथा आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील .......



सुभाषचंद्रांचे घराणे तसे गर्भश्रीमंत. त्यामुळे लहान पणापासून सर्व सुखे त्यांना मिळत गेली.पण; ते स्वतंत्र लढ्याकडे कसे वळले? ह्याची ही कथा आहे .
सुभाषबाबुंचे शिक्षण पूर्ण झाले होते, ते अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचे होते. म्हणून त्यांनी निर्णय घेतला कि आई.सी.एस.(ICS ) म्हणजे आत्ताचे आय.ए.एस.(IAS ).हे करण्यासाठी इंग्लंड ला जावे लागत असे. प्रेवश सहज मिळाला गेला.

अभ्यास प्रारंभ झाला. त्यात त्यांना दीर्घवाचन असा एक विषय असायचा. त्यात कोणताही मोठा ग्रंथ,कादंबरी वाचून काढायच्या असतात ,त्यामुळे आकलन शक्ती वाढते.सुभाषबाबुना इंग्लंड मध्ये एक ग्रंथ उपलब्ध झाला ...द वर्ल्ड ऑफ ग्रेट किंग्स....त्या ग्रंथाथ ग्रीस च्या प्राचीन राजांपासून हिंदुस्थानच्या मुघल सुल्तानी पर्यंत सर्व राजांचा उल्लेख होता .

असेच वाचन चालू असता एक छोटा परिच्छेद त्यांनी वाचला, तो वाचून त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला ..जीवनाला क्षणात कलाटणी मिळाली ,ध्येय मिळाले.....त्या परिच्छेद चा मराठी अनुवाद असा .......'' सबंध हिंदुस्थानात मुघल सत्तेचे वर्चस्व स्थापन झाले होते, मात्र त्या दक्षिणेकडील डोंगर दर्यांच्या प्रदेशात एक असा राजा होता तो त्यांना कधीच जिंकता आला नाही, उलट त्यानेच त्या मुघल सत्तेचे सिंहासन मिळवायचे ध्येय पहिले होते.

 बर्याच वीरांना त्याने ठार केले होते..खरोखर त्याची तुलना आमच्या अर्कुलास राजाशी होऊ शकेल इतका प्रजादक्ष, स्वदेशाभिमानी आणि प्रामाणिक राजा हिंदुस्थानात ३० वर्षे मोगलांशी भिडला व त्यांना जेरीस आणले ...त्या राजाचे नाव .........शिवाजी शहाजी भोसले ''
ह्या एका वाक्याने सुभाषबाबू ३ दिवस वेड्यासारखे शिवाजीराजांची पूर्ण माहिती मिळते का ते पाहत होते. इंग्लंड मध्ये त्यांना अतिशय किरकोळ माहिती मिळाली.पुढे ते आई .सी.एस.(ICS ) उत्तीर्ण झाले.गावी आले आणि त्यांना सभासदांची बखर यांचा हिंदी अनुवाद मिळाला.

झाले सुभाषबाबू शिवमय झाले. आई.सी.एस.(ICS ) ची मानाची नोकरी त्यांनी केली नाही ..ते स्वातंत्रलढ्यात उतरले ..मी माझ्या मायभूला पारतंत्र्यात टाकून सुखे कशी भोगू ? राजा शिवाजी जहागीरदाराचे पुत्र असताना त्यांनी सुखे न भोगता आपली भूमी स्वतंत्र केली मी पण माझ्या या भूमीला मुक्त करीन.अशी त्यांनी शपथ घेतली ....
त्यांच्या बरोबर इंग्लंड मध्ये त्यांचे एक मित्र होते ..विजयरत्न मुजुमदार. ते आई .सी.एस.(ICS ) उत्तीर्ण झाले होते.आणि नोकरीला पण होते .


एकदा अशीच बैठक बसली असता त्यांनी नेताजींना प्रश्न केला ....काय रे तू आता स्वतंत्र लढ्यात भाग घेतला आहेस. मला सांग या आंदोलन ,सत्याग्रह ,उपोषण ,मोर्चे यातून खरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल ???? नेताजी शांत बसले होते ..ते फक्त हसले ,बोलले काहीच नाहीत .

बैठक संपली. मुजुमदारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला...अरे सांग न ..मी काय विचारले..असल्या गोष्टीतून खरच स्वातंत्र्य मिळेल का ??
नेताजी उत्तरले...ह्या .........अजिबात नाही ....
स्वातंत्र्य एकाच गोष्टीतून मिळेल.....''शिवाजी ..शिवाजी...शिवाजी '' आणि ते चालते झाले..

असा माझ्या राजांच्या स्फूर्तीचा झरा आहे .मला अभिमान आहे मी त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो .माझ्या आयुष्याचे सोने झाले .माझी पंढरी फक्त रायगड .

सौजन्य - नेट साभार

Comments

  1. खुप छान...................... माहुहिती...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६