जसवंतसिंहाची माघार २८ में १६६४

५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात अजगरी विळखा घालून बसलेल्या शास्ताखानास राजांनी आपल्या तलवारीने पाणी पाजले. औरंगजेबाचा मामा अन् एक मर्दुमकी गाजवणारा सेनानी अशी खोटी कमवली, तीच इभ्रत दोन बोट घालवून अन् जिवाच्या अन् शिवाच्या भीतीने एकदम औरंगाबाद घाटून गमवली. तो गेला पण जवळपास पाच महिने सिंहगडाला घेरा मारून बसलेल्या जसवंतसिंहाला सिंहगड घेण्यासाठी सज्जड दमच भरला.

जसवंतसिंहाचा सिंहगड-वेढा 'बादशाही थाटात' सुरुच होत. पाच महिने उलटले. मराठे अजूनही दाद देत नव्हते. देतीलचं कसे मराठेच ते. अखेर जसवंतसिंहाने 'सुलतानढवा' म्हणजे निर्वाणीचा हल्ला चढविण्याचा निश्चय केला. त्यानुसार जय्यत तयारी करून गुरुवार दिनांक १४ एप्रिल १६६४ रोजी पूर्ण शक्तीनिशी जसवंतसिंहाने सिंहगडाच्या तटावर तोफांसह हल्ला केला. पण मराठ्यांनी तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल व राजपूत कापून काढले. त्यातच नशिबानेही जसवंतसिंहाचा घात केला अचानक दारूचा स्फोट झाला आणि त्यात अनेक मोगल सैनिक ठार झाले.

अपयशामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. प्रचंड नामुष्की पदरात पडली. सुलतान ढवा नाकामियाब झाला. अशावेळी पराभवाचे खापर आपला श्यालक राव भावसिंह हाडा याच्या माथी फोडून मोकळा झालं. मानी स्वभावाच्या भावसिंहाला हा आरोप सहन झाला नाही. त्यातूनच दोघांचा कडाक्याचा वाद जुंपला. अखेर तणतणत जसवंतसिंहाने दिनांक २० मे १६६४ रोजी सिंहगडाच्या डोंगरावरून तोफखाना खाली उतरविला. शनिवार दि. २८ मे रोजी मोगली सैन्यासह तो पुणे येथे येऊन बसला. सहासात महिने अवाढव्य खर्च करूनही औरंगजेबाच्या पदरी सिंहगड आला नाहीच. !

किल्ले सिंहगडा संबंधित काही आणखी लेख - 

किल्ले सिंहगड

आज  लढला सिंह कोंढाण्यासाठी

सिंहगडाचा  दुसरा सिंह1 comment:

  1. Anonymous04:55

    khup chan blog ahe..keep it up...vicahar changale ahet...young generation la katitari changale karavese vatate..good...

    ReplyDelete