वास्तविक तरवार गाजविणे मराठ्यांसाठी नित्यनियमाचेचं झाले होते. राजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले, विजापूरी सरदाराने पन्हाळ्यास वेढा दिला नाव सिद्दी जोहर.
विजापूरवर दबाव आणून आदिलशहाला सिद्दीच्या सैन्यातील काही सैन्य परत बोलावून घ्यावे लागेल या महत्वकांक्षी हेतूने सरसेनापती नेतोजी पालकर यांनी द्रुत गतीने घौडदौड करून विजापूरच्या आसमंतातील शहापूरवर हल्ला केला. ही वेळ रात्रीची होती. मराठ्यांनी शहापूर बेचिराख केले, लुट घडवून उद्धवस्त केले. मराठ्यांना रोखण्यासाठी आदिलशाही सेनापती मुल्ला महंमद, बाबुलखान व अजापा नायक या दोन सरदारांसह धौव्न आला.पण मराठ्यांच्या रोष एवढा विलक्षण होता की, शहाचा दारुण पराभव झाला. त्यांचे २००० घोडेस्वार मराठ्यांनी कैद केले, इकडे मराठ्यांची दुसरी तुकडी यावेळी कोकणात दाभोळ ते कुडाळ हा आदिलशाही मुलुख लुटून फस्त करीत होती. महाराजांचे ३-४ हजार लोक किनारपट्टीवर निर्भयपणे वावरत होते व खानदानी वसूल करीत होते.
विपरीत परिस्थितीतही मराठ्यांनी शके १५८२ च्या जेष्ठ शु. ८ ला म्हणजे दि. ६ जून १६६० रोजी विजापूरकरांकडील वासोटा गड जिंकून घेतलाच! प्रतापगडाकडील जेधे - बांदालांच्या लोकांनी तो जिंकला असावा.
No comments:
Post a Comment