शहाजीराजांस कैद

रणदुल्लाखानच्या मृत्युनंतर खानखानान, वजीर मुस्तफाखान हे सेनापती कर्नाटकात धुमाकूळ घालीत होते. शहाजीराजे बंगळूरास वास्तव्यास होते. त्यांना या सेनापतीच्या हाताखाली कामे करवी लागे. निजामशाहीची सूत्रे सहजरीत्या खेळवलेल्या शहाजीराजांचा कर्नाटकाशी आतापर्यंत १२ वर्षे घनिष्ट संघर्ष आला होता. विजापूरकरांचा सेनापती वारंवार बदले, पण शहाजीराजे मात्र जिंकलेल्या भागाच्या व्यवस्थेसाठी तिकडेच कायम स्थायिक झालेले होते. तेथील संस्थानिकांवर शहाजी महाराजांचा प्रभाव होता एकप्रकारे, संपूर्ण कर्नाटक, हस्त्गर केल्यासारखेच झाले! नेमक्या याच गोष्टीचे मुस्तफाखानसारख्या वजीरांना व सरदारांना वैषम्य वाटत होते. 

पहिला सेनापती रणदुल्लाखान शहाजीराजांच्या सल्ल्यानेच वागत असल्याने तोच प्रघात खानखानाने पाळला. परंतू वजीर मुस्तफाखान हा शहाजीविरोधी पक्षाचा असल्याने शहाजीविरोधी आघाडी प्रबळ झाली.  या आघाडीत  अफजलखान, बाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे इत्यादी प्रभावी सरदार मुस्तफाखानाला सामील झाले. मुस्तफाखान खान कर्नाटकस्वारीवर गेला पुन्हा विजापुरी आला परंतू कर्नाटक प्रांती विजापूर दरबारावविषयी घातपाती कट रचण्यात येत् असल्याचे वृत्त विजापूर ला येऊन पोचले (पोचवले?)  त्यामुळे मुस्तफा पुन्हा कर्नाटकात दाखल झाला. व तिथें पोचताच त्यांने शहाजीराजांस दगाबाजीने कैद केले. 

अटकेची पार्श्वभूमी -  कानडी संस्थानिकांच्या गुंतागुंतीच्या राजकारणात कुत्बशहा मदत करण्याच्या उद्देशाने त्रीमलनायकाच्या बाजूने  लढ्यात उतरला त्याने श्रीरंगराजचा ताब्यातील पेनुकोंडा हा प्रदेश जिंकून घेतला,व  खुद्द त्रीमालनायकाच्याचं (ज्यांच्यासाठी कुत्बशहा मैदानात उतरला होता त्याच्या) जिंजी किल्ल्यावर चाल केली.  श्रीरंगराजचा प्रदेशही गिळला. भीतीपोटी तंजावरच्या वेंकटनायकाने तह करून खुशाली पत्करली यात त्रीमलनायकचं एकाकी पडला नाईलाजाने त्याने विजापूरला मदतीचा हात मागितला यात शहाजी राजांनी त्यास धीर दिला, शहाजीसारखा भरभक्कम पाठींबा लाभल्याने त्रीमलनायकासोबत कावेरीपट्टणचा जगद्देव, म्हैसूरचा चामराज वोडीयार, बेदनूरचा वीरभद्र या सर्वांनीच भय टाकले व एका अर्थी हे सारे संस्थानिक शहाजीराजांना वश झाले असल्याने शहाजीराजांनीच कर्नाटक हस्तगत केल्यासारखे झाले ! अर्थातच नबाब मुस्तफाखानास हे अर्थातच सहन होण्यासारखे नव्हते.

त्यामुळेच घातपात घडला आणि श्रावण वद्य प्रतिपदा शके १५७०, मंगळवार, दि. २५ जुलै १६४८ रोजी सकाळी शहाजीराजे मुस्तफाखानाने जिंजीनजीक कैद केले.  

No comments:

Post a Comment