पोर्तुगीजांचा समाचार

मोगलांशी व सिद्दीशी संघर्ष चालू असतानाच संभाजी महाराजांच्या पोर्तुगीज या तिसऱ्या सत्तेशी संघर्ष सुरू झाला. युरोपियन सत्तांचे मराठ्यांविषयीचे धोरण हे कायमच दुटप्पी राहिले होते.

पोर्तुगीजाचे पश्चिम किनाऱ्यावर दोन ठिकाणी राज्य होते. पहिले गोव्याचे तर दुसरे उत्तर कोकणातील चौल, वसई, दमण इ. भागाचे. संभाजी महाराजांशी मैत्रीची बोलणी सुरु असतानाच पोर्तुगीज व्हाईसरॉयने स. १६८२ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांच्या मुलखांवर हल्ले करावयास आलेल्या मोगली फौजांना आपल्या प्रदेशातून जायला वाट दिली. यासंबंधीचे पत्र देखील पोर्तुगीज व्हाईसरॉय ने औरंगजेबास पाठविले.

परंतू आक्रमणास तितक्याच तीव्रतेने किंबहूना अधिक तीव्रतेने प्रतिकार हे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते. पोर्तुगीजांच्या कुरापातीचा बदला त्यांनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ यासह त्यांच्या उत्तरेकडील राज्यावर स्वारी करून घेतला (जून १६८३) ही स्वारी ६ महिने चालू होते. डॉ. व्ही. टी. गुणे यांनी म्हटले आहे की, ''उत्तर फिरंगणातील दमण ते चेऊन (चौल) पर्यंतचा सर्व प्रांत निळोपंत पेशव्याने ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८३ पर्यंत काबीज केला. तेव्हा ४००० गोवेकर ख्रिस्ती व गोरे सैनिक मुंबईच्या आश्रयास गेले."

खुद्द संभाजी महाराजांनी चौलच्या ठाण्यास वेढा दिला व तोफांची मारगिरी सुरु केली तेव्हा आतील पोर्तुगीजांची कशी दयनीय अवस्था झाली हे स्नाग्ताना मराठा-पोर्तुगीज संबंधाचे दुसरे मोठें संशोधक स. शं. देसाई म्हणतात : १० ऑगस्ट पासून १८ ऑगस्टपर्यंत मराठ्यांनी चौलच्या तटबंदीवर अविरत हल्ले चढविले. आतील शिबंदी लढून लढून थकून गेली. ते पाहून शहरातील भिक्षु आणि नागरिक लढावयास आले. त्या दरम्यान मराठ्यांचे हल्ले विफल व्हावे, म्हणून पोर्तुगीजांनी 'मेरी व्हर्जिन आणि सेंट स्टीफन यांची करुणा भाकण्यास प्रारंभ केला होता ठाण्याच्या कॅप्टन तर 'सेंट अ‍ँथनी'ची आळवणी करून त्याच्या चरणाजवळ साथ अश्रफी ठेवल्या. (पण) मराठे मागे हटेनात...

संभाजी महाराजांच्या गोव्याच्या स्वारीत तेथील पोर्तुगीजांनी सेंट झेवियर ची केलेली प्रार्थना इतिहासात प्रसिद्ध आहे. ही अजून एक!

उत्तरेकडून मराठ्यांनी काढतापाय घ्यावा म्हणून पोर्तुगीजांनी दक्षिण गोव्यालगतच्या  प्रदेशावर फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे ठरविले.

फोंड्याची लढाई ही इतिहास प्रसिद्ध आहेच............तर अशा प्रकारे मोडला पोर्तुगीजांचा माज

No comments:

Post a Comment