स्वातंत्र्य.....

तुम्हीच दाखविले महत्व स्वातंत्र्याचे
तुम्हीच फोडिले तख्त मदांध पारतंत्र्याचे
तुमचीच प्रेरणा सदैव शहीदांना लाभली
हे स्वातंत्र्यसूर्या मान तुम्हापुढे करोडोंची लवली
.
कडाडला शिव, हा तर गोरा डाग स्वराज्यावर, मधात बुडवूनि दिली आम्हाला जहरी खडीसाखर
गोड बोलुनी चाल चालती, निमित्तास व्यापार मराठमोळ्या कुदळी खणती ढोंगी, धूर्त वखार .
छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गोऱ्या लोकांचे डाव आधीच ओळखले होते. राजे स्वतः जातीने यांच्या मुसक्या अवळत आणि त्यांच्याच देखरेखीखाली घडणाऱ्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना देखील अखंड सावधानतेचा इशारा देत. इंग्रजांनी केलेली छोटीशी हालचाल देखील त्यांना सहन होत नसे ते लगेचच त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडत.

संभाजी राजेंनी देखील शिवाजी महाराजांच्या पावलावर पाउल ठेवतच हे कार्य पुढे चालविले इंग्रज १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई सुरत अशा बंदरावर होते त्यात मुंबईवर त्यांची हुकुमत बऱ्याप्रमणात चालायची संभाजी राजांनी त्यांच्या काळात इंग्रजांची दखल अगदी बारकाईने घेतली. संभाजी राजेंना पुढे उत्पन्न होणाऱ्या धोक्याची चाहूल जणु आधीच लागावी म्हणूनच की काय, आधी या गोऱ्या टोपीकरांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्या वखारीसाठीची जागांचेप्रमाण निश्चित करून दिले, इंग्रजांकडे जे लोक कामाला होते त्यांची संपूर्ण माहिती स्वराज्य प्रशासनास दिल्याशिवाय त्यांना कामवर रुजू होता येत नसे, शिवाजी राजेंना कधी या इंग्रजांनी महाराज असे चुकून सुद्धा संबोधले नव्हते परंतू संभाजी राजांचा इतका धसका इंग्रजांनी घेतला होता की छत्रपती संभाजी महाराज राजे अशी पदवी ते संभाजी राजांना लावताच संभाजी राजांचा एखादा माणूस जरी काही खलिता वैगरे घेऊन इंग्रजांकडे गेला तर त्यास मानपानात कधीच कमतरता नसते इतका धसका या व्यापाऱ्यांनी घेतला होता.
इंग्रज १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई सुरत अशा बंदरावर होते त्यात मुंबईवर त्यांची हुकुमत बऱ्याप्रमणात चालायची संभाजी राजांनी त्यांच्या काळात इंग्रजांची दखल अगदी बारकाईने घेतली. संभाजी राजेंना पुढे उत्पन्न होणाऱ्या धोक्याची चाहूल जणु आधीच लागावी म्हणूनच की काय, आधी या गोऱ्या टोपीकरांच्या मुसक्या आवळल्या आणि मुंबईचा गव्हर्नर केज्विन याच्याकडे संभाजी महाराजांनी मुबई बंदर विकतच मागितली आणि विकण्याविषयी करार देखील झाला होता. परंतू ऐनवेळी संभाजी राजे औरंगजेबाच्या हाती लागले....केवळ दुर्दैव
.
तो जर करार यशस्वी झाला असताना तर १५० वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर रुतलेच नसते.
.
स्वतः एका इंग्रजाने आपल्या पुस्तकात इंग्रजांना उद्देशून लिहिले आहे की. तुम्ही इंग्रज लोक खरच भाग्यवान रे की तो शिवाजी जमिनीवर जन्माला आला. अरे खरच तुम्ही भाग्यवान त्या शिवाजीला आयुष्य कमी पडले रे ते शिवाजी आणखी १० वर्षे जगतेना तर १५० राज्य करायचे विचारतर सोडाच पण तुम्हला हिंदुस्तानचा साधा चेहेरा सुद्धा पहायला मिळाला नसता रे खरचं तुम्ही भाग्यवान
.
या आधी १५ ऑगस्ट विशेष सोहळ्याने संपन्न व्हायचे. घरोघरी आनंदाचे जणू दसरा-दिवाळीचे चैतन्य असायचे पण आता काळ बदललाय. हल्ली १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी भुशी डॅम, लोणावळा, खडकवासला, सिंहगड अशा ठिकाणी साजरे होतात. आणि साजरे म्हणजे फक्त सुट्टी एन्जॉय करतात.
.
अलीकडील काळातील स्थिती दाखविण्यासाठी पुढील कविता एकदम योग्य आहे....
आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
आनंदाने भरून आलाय ऊर
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर…
आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!
आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !
पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
“कौन बनेगा करोडपती” संपून
झालेत बरेच दिवस !
आज १५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका
उद्याच पडणार ठाऊक आहे
त्यांचा रंग फ़िका..!
आज १५ ऑगस्ट ना ,
मग म्हण “विविधतेत एकता”
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!
आज १५ ऑगस्ट ना ,
“मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.
आज १५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .
काळजी करू नकोस
असंच करत करत या देशाने गाठलीय सासाष्ठी
छापील भाषण मात्र जपून ठेव
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!
(कविता -अनामिक)

No comments:

Post a Comment