तिरसट आणि अस्वस्थ औरंगजेब

१६८३ च्या मार्च महिन्यात अकबराच्या विरुद्ध ज्या मोगल फौजा पाठविण्यात आल्या होत्या त्या बादशहाने परत बोलाविल्या. २३ मार्च रोजी रहुल्ला खान आणि रणमस्तखान यांनी कल्याणचा ताबा सोडला परंतू ताबा सोडतांना त्यांनी शहराभोवती संरक्षणाकरिता जी तटबंदी बांधली होती. ती त्यांनी पाडली आणी जाळून टाकली. मोगल सैन्य माघार घेत असतांना रुपाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठा संयाने तीतवाला ह्याठिकाणी (कल्याणच्या ईशान्येला सात मैलावर) मोगलांवर अकस्मात हल्ला चढविला. त्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार मारले गेले आणि मराठ्यांनी अनेक घोडी पळवून नेली.

  अशा रीतीने दक्षिणेत आल्यानंतर एकवर्षापेक्षा म्हणजे नोव्हेबर १६८१ ते एप्रिल १६८३ पासूनचा कालखंड लोटून गेला तरी बादशहाला, त्याच्याजवळ इतकी अफाट साधनसामग्री असताना सुद्धा, कोणतीही भरीव कामगिरी साध्य करता आली नाही. खरी परिस्थिती अशी होती की बादशहाला ह्यावेळी घरगुती आणि मानसिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत होते, स्वतःच्या कुटुंबावरचा त्याचा विश्वास उडून गेला होता. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये आणि आपण कुठे रहावे म्हणजे सुरक्षित राहू हेही त्याला कळेनासे झालेले होते. ह्यामुळे बादशाहचे ह्यानंतरचे धोरण धरसोडीचे, संशयी, सावध आणि वरवर पहाता दुष्टपणाचे आणि परस्परविरोधी असे झालेले होते. २ ऑक्टोबर १६८६ रोजी सुरतेच्या इंग्रजांनी लिहिले, "बादशहाचे मन केव्हा फिरेल हे सांगणे कठीण झाले आहे. त्याची वृत्ती सतत धरसोडीची झालेली आहे. राजपुत्र अकबरामुळे तो कमालीचा तिरसट आणि अस्वस्थ बनला आहे. अकबराला ममता दाखवितात ह्या केवळ संशयावरून सुलताना आझम, बेगम (जहानजेब बानू) आणि दिलेरखान यांना सर्वांसमक्ष अपमानीत करण्यात आले. वास्तविक ह्या आरोपात कोणतेही तथ्य नव्हते. त्यामुळे ज्यांचे बादशहाही नाजुक संबंध आहेत ती सगळी माणसे बादशहाशी वागतांना अतिशय काळजी घेत आहेत."

मराठ्यांनी खुद्द औरंगजेब सारख्या माणसाचे मानसिक खच्चीकरण केले. त्याकाळात औरंगजेब म्हणजे TIME Magazine मधला MAN OF THE YEAR या खिताबाच्या तोडीचा तर होताच होता त्यालाचं येडा बनवला.

No comments:

Post a Comment