मावळच्या मराठ्यांची माळव्यातील आक्रमणे (सुरवात)

इ. स. १६९९ च्या नोव्हेंबर महिन्यात कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पहिल्या प्रथम नर्मदा नदी ओलांडली आणि त्यांनी धामुणीच्या परिसरापर्यंत माळव्यावर आक्रमण केले. माळव्याचा मार्ग अशा रीतीने खुला झाल्यानंतर तो कधीही बंद झाला नाही. आणि याचाच परिणाम म्हणून शेवटी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत माळवा हा पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात गेला. जानेवारी १७०३ मध्ये मराठ्यांनी नर्मदा नदी पुन्हा ओलांडली आणि त्यांनी उज्जैनच्या परिसरात मोठा उपद्रव निर्माण केला.

ऑक्टोबर १७०३ मध्ये नेमाजी शिंदे हे एखाद्या लाटेप्रमाणे वऱ्हाडवर जाऊन कोसळले. त्यांनी (फिरोजजंगच्या वतीने नेमल्या गेलेला) वऱ्हाडचा नायाब सुभेदार रुस्तुमखान याचा पराभव केला आणि त्याला युद्धाकैदी म्हणून पकडले, त्यानंतर हुशंगाबाद जिल्ह्यावर हल्ला चढवून नेमाजी शिंदे छत्रसालाच्या विनंतीवरून नर्मदा ओलांडून माळव्यात आला. अनेक खेडी आणि गावे लुटल्यानंतर त्याने सिरोंजला वेढा दिला. परंतु यावेळी दुसऱ्या एका मराठा सैन्याचा पाठलाग करीत फिरोजजंगाने वऱ्हाडात प्रवेश केलेला होता

त्याने निवडक सैनिकांनीशी बातमी मिळताच हल्लेखोरांचा (मराठ्यांचा) पाठलाग चालविला. त्यामुळे यावेळी मराठ्यांना काढता पाय घ्यावा लागला. युद्धकैदी बनवलेल्या रुस्तमखान, त्याचा अनुयायांना सोडून द्यावे लागले.  यानंतर पुन्हा एकदा नेमाजींच्या सैन्यावर धामुणीच्या जंगलानजीक हल्ला चढविण्यात आला, या हल्ल्यात मराठ्यांचे बरेच सैनिक मारले गेला तसेच मोगलांच्या बाजूनेदेखील बरेच नुकसान झाले.

  मोग्ल्यांचे यामुळे फारच मोठ्या संकटातून सुटका झाली. वऱ्हाडमध्ये मराठ्यांनी जो उपद्रव चालविला होता त्यामुळे खबरकरांनी पाठवलेली पत्रे आणि सरकारी पत्रे ही जवळजवळ चार पाच महीने नर्मदेच्या तीरावरचं रोखली गेली होती. फिरोजजंगाच्या धाडसामुळे माळवयाची संकटातून सुटका झाली. आणि त्यामुळे तिथली स्थिती किती गंभीर आहे. याची औरंगजेबाला कल्पना आह्ली. म्हणून त्याने औरंगाबाद आणि खानदेश या ठिकाणी नेमण्यात आलेला सुभेदार राजपुत्र बिदरबख्त याची, तो अतिशय शूर आणि धाडसी सेनापती असल्यामुळे, ३ ऑगस्ट १७०४ रोजी माळव्याचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.

पण विशेष काही परिणाम झाला नाही. "नोकरीत नसलेल्या मराठ्यांनी, बुंदेल्यांनी आणि अफगाणांनी या सुभ्यात उपद्रव चालविला आहे." औरंगजेबाने स्वतः या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. "खानदेशचा सुभा पूर्णपणे उजाड बनलेला आहे. माळव्याचा सुद्धा नाश घडून आलेला आहे - फारच थोडे पीक उभे असलेले दिसते.

(Short Histroy of Aurangjeb - Jadunath Sarkar
औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास - अनु. डॉ. कोलारकर)   

No comments:

Post a Comment