बारगीर

बंगाली भाषिकांचा इतिहास, सेनगुप्ता यांनी असे लिहिले आहे कि, "बर्गी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे, तसेच ते खास करून हटकर लोक असत जे घोडेस्वार आणि शस्त्र घेऊन मराठा साम्राज्यात शिलेदार या पदावर असत.हटकर या समाजाला बर्गे हे एक उपनाव देखील आहे. त्यात बर्गे,बारगळ अशी आडनावे आहेत. थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर- होळकर यांचे मामा सुद्धा सरदार कदमबांडे यांच्याकडे बारगीळ होते. त्या काळात हे सर्वच जण 'मराठा धनगर' म्हणून ओळखले जात असत. त्यानंतरच्या काळात यापैकी रघुजी कारंडे.. ते नागपूरकर भोसले यांचे विश्वासू आणि सेनापती होते.

'Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकाऱ्याने बेरर (सध्याचा मराठवाड्यातील काही भाग) या भागात सह्हायक आयुक्त असताना काही माहिती गोळा केली त्यात असे म्हटले आहे कि. " हटकर असे म्हणतात कि जेव्हा दिल्लीच्या बादशहातर्फे निजामाला दक्खनचा सुभेदार म्हणून नेमले गेले त्याच काळात आम्ही इथे आले आहोत, सर्व हटकर हे मेंढपाळ (धनगर) ,भाला घेऊन मेंढपाळ करणारे आहेत. हटकर असे म्हणतात कि, ते जेव्हा कधी कुठल्या मोहिमेसाठी बाहेर निघतात तेव्हा फक्त सात हात लांब घोंगडी आणि भाला, बर्ची घेऊनच. त्यामुळेच कदाचित त्यांना बारगीर म्हटले जात असावे. हटकर यांचा स्वभाव हट्टी आणि भांडखोर आहे असे म्हटले जाते." उडिया आणि बंगाली या भाषिक लोकांनी तिथल्या भाषेत आपली लहान मुले झोपावीत म्हणून काही अंगी गीते तयार केली आहे त्यातील हि प्रसिध्द कडवी. "छेले घुमलो पारा जुरालो बर्गी एलो देशे बुल्बुलीते धन खेयेच्छे खंजा डेबो किसे ?" याचा मराठी अर्थ- मुलांनो शांत झोपा बारगीर आपल्या जमिनीवर (शेतात) आलेले आहेत. आणि पक्षी पण आपल धन खाऊन जातील. मग आपण आपले जमिनीचे कर (पैसे) कसे भरणार ?

आभार - सुमित लोखंडे.


Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६