उंबरखिंड

शास्ताखान पुण्यात ठाण मांडून बसला याच काळात आजूबाजूच्या परिसरात हातपाय पसरण्याचा त्याचा मनसुबा तडीस नेण्याच्या उद्देशाने त्याने सुरवात केली. विश्वासू सरदारांना एकांतात भेटून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे हा भाग हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली गेली. कारतालाबखानसोबत कछ्प, चव्हाण, अमरसिंह, सर्जेराव गाढे, कोकाटे, जाधवराव यांची या मोहीमी साठी नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे यात या सरदारांशिवाय माहुरची रायबाघनदेखील या मोहिमेत सामील होणार होती.

बरेच मोठे सैन्य घेऊन कारतालाबखान लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे सरकू लागला. वाट मोठी बिकट निरुंद गहन अरण्य ओलांडून पुन्हा सह्याद्रीची बिकट चढण चढून उतरायची व मग उंबरखिंडीतून खाली उतरायचे होते. इकडे कारतलबखानाच्या सर्व बातम्या महाराजांपातूर पोचतच हुत्या. राजांनी उंबरखिंडीच्या झाडीत सैन्य दाबून ठेवले.

मोठी चढण चढून उतरून खानाचे सैन्य खिंडीत उतरले आणि रणभेरी निनादू लागल्या शत्रूने घेरल्याचे एव्हाना खानास समजले होते. बाणांचा बंदुकांचा मारा परस्परांवर होऊ लागला. प्रारंभी अमरसिंहाने व मित्रसेनाने मराठ्यांना चांगलेच तोंड दिले. रानोरान पळत सुटलेल्या आपल्या सैन्याला मित्रसेन घाबरू नका, स्थिर राहा असा धीर देत होता. पण एक गोष्ट होती कि कोंडीत सापडून सुधा कारतालाब खान युद्धावेश सोडत नव्हताचं, पण मराठ्यांच्या माऱ्यापुढे आता मात्र मोघलांची मात्र चालेन तेव्हा रायबाघन खानकडे आली. आणि तिने कारतालाबखानाला युद्धाची भाषा सोडून शरणागतीचे बोलणे करण्याचा सल्ला दिला.

उशिरा का होईना पण कारतालाब खानास शहाणपणा सुचला आणि ३ फेब्रुवारी १६६१ रोजी युद्धविराम झाला अर्थात त्यासाठी मोठी खंडणी खानास मोजावी लागलीचं  


फोटो - नेट साभार

Comments

  1. भारी लिहलय.blog address bookmark करुन ठेवलाय..अधून मधून visit करेल.😊

    ReplyDelete
  2. जय शिवराय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६