ह्याला म्हणत्यात मराठी बाणा.....!


११ मार्च १६८९ संभाजी महाराज गेले, मराठा रियासतीवर शोककळा पसरली. काही काळ मराठ्यांचा निर्घुण पाडावच झाला. मराठ्यांचे अनेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. अशाच वेळी राजाराम महाराजांनी सूत्रे हातात घेऊन खंबीरपणे लढा दिला. जणू मोडलेले डाव पुन्हा उभारणे हा मराठ्यांचा रक्तगुणच आणि ह्याच गुणावर संताजी धनाजी आणि कित्येक ज्ञात अज्ञात

मावळ्यांच्या भीम पराक्रमामुळे ही गोष्ट साधता आली म्हणूनच १६८९ ते १६९१ पर्यंत जो मोगल मराठा संघर्ष चालू होता त्यात संपूर्ण मराठी रयतेस एक गोष्ट मनोमन उमजली की, मराठी राज्य आता बुडत नाही, औरंगजेब बादशाहाला-मोगलांना जाऊन मिळालेल्या मराठी सरदारांना देखील असेच काही उमगले असावे. म्हणूनच नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यांसारखे मराठे सरदार पुन्हा स्वराज्यात आले. अखिल मराठी जनतेत आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता.

या सुमारास महाराष्ट्रात एक प्रकारे नवचैतन्याचे वारे वाहत होते, याचे दर्शन घडविणारे एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे. हे पत्र मावळ प्रांताचा सुभेदार. महादजी शामराज या मराठा अधिकाऱ्याने तर्फ मुठे खोऱ्याच्या हवालदारास लिहिले आहे - (२४ सप्टेंबर १६९०).

त्यात महादजी म्हणतो " मोगलाची धामधूम आपल्या राज्यात आजी तीस वर्षे होत आहे. यामुले मुलुख वैराण जाला. मुलखात मोगलाईचा अमल चालिला. हली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे."


रायगड नोव्हेंबर १६८९ मध्ये मोगलांच्या हाती पडला तेव्हा आकाश कोसळल्यासारखी मराठ्यांची स्थिती झाली होती आणि अवघ्या वर्षभराने म्हणजे सप्टेंबर १६९० मध्ये मराठे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते की, श्रीकृपेने राज्याचा मामला थाटात चालला आहे !


ह्याला म्हणत्यात मराठी बाणा.....!
(संदर्भ - सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार)

Comments

  1. kharach khup preranadayi ahe .....mala garva ani abhiman ahe mi MARATHI aslyacha !

    ReplyDelete
  2. shambhubhaktta mahesh08:53

    hya marathi mati sathi pran vechlelya veer vaghanna manacha mujra

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक