दत्ताजी शिंदे


गुरुवार १० जानेवारी १७६१ रोजी संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.

दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,

" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"


आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,

"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"


कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.


रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड
बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

Comments

  1. याला पहिली प्रतिक्रिया माझीच आहे.
    खरच फार सुंदर कामगिरी करतोस अभिषेक तू.....
    आपला इतिहास आपणच जिवंत ठेवायचा आहे...
    जय शिवराय

    ReplyDelete
  2. साक्षात राहुल बुलबुले यांची प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉग नक्कीच चांगला झाला आसावा

    ReplyDelete
  3. Anonymous19:35

    पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा

    ReplyDelete
  4. हा इतिहास माहित असला तरी पुन्हा पुन्हा वाचण्यात समाधान आहे.आपण खूप उत्तम काम करीत आहात.आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचायलाच हवा.त्या दृष्टीने हा ब्लोग एकदम उत्तम.नरवीर दत्ताजीना लाख लाख सलाम.आपण वेळोवेळी इतिहासाची आठवण करून देता हे फार चांगले आहे.असेच लिहित राहा.जय शिवराय.

    ReplyDelete
  5. Dattaji Shinde yanna Shraddhanjali.... Manacha Mujara....

    ReplyDelete
  6. मराठ्यांच्या बाणेदारपणा आणि शौर्याचे साक्षात उदहारण,माझा सादर प्रणाम .

    ReplyDelete
  7. तु आहेस म्हणुन आम्ही आहोत जय शिवराय

    ReplyDelete
  8. Dattaji Shinde yanna.....Manacha Mujara..!!!!!

    ReplyDelete
  9. ज्या प्रमाने काहीतरी दुर्दैवी अघटित घडुन गेल्यावर जसे मन सुन्न होऊन जाते त्याच प्रमाणे हा लेख वाचुन झाल्यावर माझे मन सुन्न होऊन गेले.....धन्य ते शिवराय, धन्य त्यांचे मावळे!!!!!

    ReplyDelete
  10. Shevati Marathach

    Jay Shivaray

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. are tya tivashi kafala asel to yamunecha kaat

    jyane pahila ha ransangram, bhitine ani sudbhavanene tychehi pani thartharle asel.
    kutubshahala manav are ya senyatil 1 datta gela manun kay zale ase hajaro dattaji aamachyakade aahet, ani te sarva todis tod aahet himmat asel tar aadhav. maradhbanyachi shapat gheun sangato, dattajichya vadhacha vachapa kadhalyashivay shant basun denar nahi.ani kuthubya tu hi chant padashil ki marathi manuns manaje nemeka kay & wagh ani yachyat farak to kay?
    thanks abhi for sharing this.
    JAI SHIVAJI JAI BHAVANI.

    ReplyDelete
  13. बंधू तारीख बरोबर आहे पण वर्ष चुकीचे आहे
    दत्ताजी शिंदे हे १० जानेवारी १७६० मध्ये पावन झाले...आणि
    १४ जानेवारी १७६१ ह्या दिवशी पानिपत घडले
    कृपया नोंद घ्यावी.

    दत्ताजींचा जो एकेरी उल्लेख आहे तो आदरार्थी असावा...

    ReplyDelete
  14. असचं लिहित राहा. मित्रा अशीच प्रेना
    देत जा.

    ReplyDelete
  15. maharashtrat jo janmala yeto to matisathi marnyakaritach yeto
    HAR HAR MAHADEV
    JAY SHIVRAY

    ReplyDelete
  16. Anonymous23:53

    खरचं। असा इतिहास वाचल्यावर रक्त खवळुन उठतं॥

    ReplyDelete
  17. Anonymous10:35

    should be 1760, not 1761

    ReplyDelete
  18. sopan patil13:15

    angavar kata uthato,dokyala aadya padtat,hata payat aek takat sancharte aani dolyatun aasu pdayla kartat ,,,ho kharach garv aahe mala mazya shivrayacha aani tyanchya mavlyancha,,,jay bhavani jay shivray.........

    ReplyDelete
  19. maze awadte dattaji shinde,ani tyncha itihas wachun mazi chati fugun war ali aaj dhny zalo

    ReplyDelete
  20. Anonymous23:01

    कायदेशीर परवानगी आणि कशी घेतात ती??? नावासह छापला तर काही हरकत आहे का??

    ReplyDelete
  21. Subdar varnan kelay...:)

    ReplyDelete
  22. Hath shivshivtat talvar hata ghyala..... ajchya jagat apan karch ase kahi karu shakto ka ha sagla itihas sarvanparyant pohchvayla, ha 1ch prashna satavto. me sagyancha aadar karto je he kam chokh pane par padat ahet.

    ReplyDelete
  23. Anonymous06:50

    Manacha mujra...har har mahadev

    ReplyDelete
  24. कौरव पांडव ...संगर तांडव ..द्वापार काली होय अति ...

    तैसे मराठे ...गिलचे साचे कलीत ..लढले पानिपती ...

    ReplyDelete
  25. कौरव पांडव ...संगर तांडव
    please find on Google and enjoy poem on Panipat war

    ReplyDelete
  26. He aatach me facebook var pahile..tumhi lihilela saralsaral copy paste kelay

    ReplyDelete
  27. Thank you for the post from, "Panipat", by Vishwas Patil.

    ReplyDelete
  28. जयस्तु मराठा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब