पानिपत

कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अतिं;
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती ||

आम्ही झुंजलो दिल्लीच्या पातशाहीसाठी, हिंदुस्तानच्या अभिमानासाठी. मात्र दुर्दैवान उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही, रजपूत राणे राजस्थानच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवानं या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हांला वाट्टेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरविणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन् तेथूनच अवकळा सुरु झाली.

तरीही भाऊसाहेब पानितापाच्या मातीत गाडून उभे होते. मात्र नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवीत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रियापोरांचं, यात्रेकरूंच लटांबर सोबत असण हे काळरुढीनंच भाऊंच्या पाठीवर लादलेलं ओझं होतं. पण त्यामुळे हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्यानं तिळभर विश्रांती घेतली नाही.



शेवटी अन्नान दश झालेली मराठी सेना झाडाची पानं आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोण्या ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचं कारण नाही. ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला, त्या आमच्या महाशत्रूनंच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनंच लिहून ठेवलं आहे,

'दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्फिंदार (आफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जून) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्यानं तोंडात बोटं घालून चावली असती ! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य !'

Comments

  1. क्या बात !!!!
    २५१ वर्ष झाले पण अजूनही या योद्ध्यांच्या नावावर वाद चालू आहेत...

    जयस्तू मराठा देश

    ReplyDelete
  2. राहुल मित्रा नावावरून नाही तर जाती वरून वाद चालू आहे रे

    ReplyDelete
  3. उत्तम लेख.

    ReplyDelete
  4. @भावलेलं पान मित्र त्यात यांचेच नाव खराब होत आहे ना???



    आला जेव्हा अब्दाली लूटण्या गिळण्या हिँदूस्तन।
    उद्वस्त केली काशी मथूरा केले त्याने इथे कब्रस्तान ।
    दौडले तेव्हा जरीपटक्यासह राखण्या हिदूस्तानची शान ।
    पानिपतात दौडले घेऊन भवानीची आण ।
    शत्रूची केली दाणादाण काढून गिलच्यांची ताण ।
    नव्हते उरले त्यांना रणांगणावर भान ।
    झटले हिंदूस्तानचा राखण्यामान ।
    मान राखण्यासाठी छाटली स्वताःची मान ।
    मान छाटूनीही ताट केली महाराष्ट्राची मान ।
    तरी जरी हरलो असो पानिपत आम्ही या भरतभूमीचा रक्ताने अभिषेक केला अम्ही ।
    वस्त्रहरण होत होते या हिंदभूमीच्या मातीचे ।
    कृष्णापरी वस्त्र घेउन धावलो आम्ही मरहट्ट्यांच्या जातीचे।
    14जानेवारी सन 1761!!!
    पानिपतच्या भिषण रणसंग्रामात रक्त गोठवणाय्रा थंडीत सळसळत्यारक्ताच्या मर्द मराठ्यांनीपराक्रमाची शर्थ केली. देशरक्षणार्थ झटणाय्रा मराठ्यांच्या रक्ताने पानिपताची भूमी पावन झाली.
    पानिपतात थारातीर्थी पडलेल्या मराठी मातीतल्या नरविरांना काळजापासून मानाचा मुजरा!
    जय जय जय महारष्ट्र ।

    ReplyDelete
  5. TYA SHURVERANA MANACHA MU
    JARA

    ReplyDelete
  6. Priyatai22:48

    अप्रतीम लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. plz see my book on panipat https://www.facebook.com/pages/Third-Battle-of-Panipat/265170066922810

      Delete
  7. दीड लाख मराठी घरातील बांगड्या फुटल्या !

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेख ...खरच पानिपत संग्रामावर संशोधन व्हायलाच हव!!

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. ya afat parakramala salaam! Tya vir yodhynana salaam

    ReplyDelete
  11. tya shurvirana maza manacha mujara !!!!!!

    ReplyDelete
  12. I have written a book on third battle of panipat hope you do see that https://www.facebook.com/pages/Third-Battle-of-Panipat/265170066922810

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब